एक्स्प्लोर
SIP Investment : कम्पाऊंडिंगची जादू, 3000, 4000 अन् 5000 रुपयांच्या एसआयपीनं अडीच कोटी रुपये कसे उभारणार?
SIP Investment : खासगी क्षेत्रातील नोकरदारांकडून गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून एसआयपीचा मार्ग अलंबला जातो. 3000 रुपयांच्या एसआयपीनं देखील तुम्ही चांगला निधी जमवू शकता.
एसआयपी अपडेट
1/5

रचनात्मक गुंतवणूक योजना म्हणजेच एसआयपीला शिस्तबद्ध आणि नियमित गुंतवणूक म्हटलं जातं. याद्वारे तुम्ही ठराविक रकमेची दरमहा एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागते. छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरु करता येते.
2/5

एसआयपीचा प्रमुख फायदा म्हणजे यामध्ये कम्पाऊंडिंगचा फायदा मिळतो. यामुळं तुम्ही जितका काळ गुंतवणूक कराल तितका वेळ तुम्हाला कम्पाऊंडिंगचा फायदा मिळेल. 3000 रुपये, 4000 रुपये किंवा 5000 रुपयांच्या एसआयपीनं अडीच कोटी रुपयांचा कॉर्पस कसा उभारायचा हे जाणून घेणं आवश्यक आहे.
3/5

तुम्ही दरमहा 3000 रुपये एसआयपीद्वारे गुंतवल्यास 37 वर्षानंतर अडीच कोटी रुपयांचा कॉर्पस तयार झालेला असेल. तुम्ही 1332000 रुपयांची गुंतवणूक कराल. त्यावर तुम्हाला भांडवली नफा 2 कोटी 34 लाख 91 हजार 534 रुपये मिळेल. म्हणजेच तुमचा कॉर्पस 2 कोटी 48 लाख 23534 रुपये असेल.
4/5

तुम्हाला चार हजारांच्या एसआयपीद्वारे अडीच कोटींचा कॉर्पस निर्माण करण्यास 35 वर्ष लागतील. तुम्ही 4000 च्या एसआयपीनं 35 वर्षात 1680000 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. 12 टक्के सीएजीआरच्या हिशोबानं 2 कोटी 43 लाख एक हजार 76 रुपये भांडवली नफा मिळेल. एकूण 2 कोटी 59 लाख 81 हजार 76 रुपयांचा निधी जमा होण्यास 35 वर्ष लागतील.
5/5

5000 रुपयांच्या एसआयपीनं अडीच कोटींचा कॉर्पस जमा होण्यास 33 वर्ष लागतील. एसआयपीद्वारे गुंतवणूकदाराला 1980000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यावर भांडवली नफा 2,34,89,990 इतका मिळेल. म्हणजेच त्याचा एकूण कॉर्पस 2,54,69,990 रुपये होईल. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 20 Feb 2025 02:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
छत्रपती संभाजी नगर
कोल्हापूर
























