एक्स्प्लोर
ती चूक आता होणार नाही, एप्रिल-मे महिन्यात निवडणुका; उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना
मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून यंदाची निवडणूक अत्यंत लक्षवेधी असणार आहे. कारण, शिवसेनेतील फुटीनंतरही ही पहिलीच बीएमसी निवडणूक आहे.

Uddhav Thackeray says about election Shivsena UBT
1/7

मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून यंदाची निवडणूक अत्यंत लक्षवेधी असणार आहे. कारण, शिवसेनेतील फुटीनंतरही ही पहिलीच बीएमसी निवडणूक आहे.
2/7

मुंबईतील कुर्ला व कलिना मतदारसंघातील विभाग क्रमांक 6 च्या विभागप्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकारी व शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी, उद्धव ठाकरेंनी त्यांना निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले
3/7

उद्धव ठाकरे यांना धक्यावर धक्के बसत आहेत, पण आता मी धक्का पुरुष झालोय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. कोण किती धक्के देतंय ते बघूया, यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का देऊ, त्यावेळी असा देऊ की हे पुन्हा दिसता कामा नये, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.
4/7

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, सर्वांना सर्वांनी शाखेनुसार दिलेली कामं करावी असे शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
5/7

विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक आता होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असेही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.
6/7

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होतील असे दिसून येत आहे. कारण, याच महिन्यात निवडणुकांतील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्ष कामाला लागले आहे.
7/7

मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही शिवसेना व मनसेसोबत बोलणी करुन तयारी सुरू केली आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनाही दंड थोपटून तयार आहे. तर, राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचही तयारीला लागली आहे.
Published at : 20 Feb 2025 03:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion