बँकेत FD करण्याचा विचार करताय? 'या' 6 बँकेत गुंतवणूक करा, कमी काळात अधिक नफा मिळवा
अनेक बँकांचे FD चे व्याजदर हे वेगवेगळे आहेत. कोणत्या बँकेत चांगला परतावा मिळतो, त्या बँकेत तुम्हाला पैशांची गुंतवणूक करणं फायद्याचे ठरते.
Bank FD : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचे (Investment) विविध मार्ग उपलब्ध आहेत. कमी काळत अधिक परतावा मिळणाऱ्या देखील काही योजना आहेत. दरम्यान, सुरक्षीत आणि चांगला पतवामा मिळाणाऱ्या योजना म्हणून FD कडे पाहिलं जाते. मात्र, अनेक बँकांचे FD चे व्याजदर हे वेगवेगळे आहेत. कोणत्या बँकेत चांगला परतावा मिळतो, त्या बँकेत तुम्हाला पैशांची गुंतवणूक करणं फायद्याचे ठरते. आज आपण FD च्या ठेवीवर चांगला परतावा देणाऱ्या बँकांच्या संदर्भातील माहिती पाहणार आहोत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. त्याचबरोबर आगामी काळातही ही स्थिती कायम राहू शकते. RBI च्या निर्णयानंतर एका खासगी बँकेने आधीच आपल्या बचत बँकेच्या व्याजदरात कपात केली आहे. इतकेच नाही तर बहुतेक खासगी आणि सरकारी बँका लवकरच त्यांच्या एफडीवरील व्याजदरात कपात करतील अशी अपेक्षा आहे. बँकांनी असे करण्यापूर्वी, तुमची बचत FD मध्ये लॉक करण्यासाठी देखील ही चांगली वेळ मानली जाते. मात्र, FD वरील व्याज उत्पन्न करपात्र असल्यामुळे FD मध्ये जास्त पैसे लॉक करणे टाळण्याची शिफारसही तज्ञांनी केली आहे. दरम्यान, FD मध्ये गुंतवणूक केलेली ठेव ही सुरक्षीत मानली जाते.
एका वर्षाच्या ठेवीवर कोणत्या बँकेत FD ठेवीवर किती मिळतो व्याजदर?
HDFC बँक
सर्वात मोठी खासगी बँक सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षाच्या FD ठेवींवर 6.6 टक्के आणि 7.10 टक्के व्याजदर देते.
ICICI बँक
ICICI बँक ही खासगी सावकार सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षाच्या FD ठेवींवर 6.7 टक्के आणि 7.20 टक्के व्याज देते.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक खासगी बँक सामान्य नागरिकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षाच्या एफडी ठेवीवर 7.6 टक्के जास्त व्याज देते.
फेडरल बँक
फेडरल बँक ही सामान्य नागरिकांना 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षाच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज देते.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा ही बँक सामान्य नागरिकांना 6.85 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षाच्या एफडीवर 7.35 टक्के व्याज देते.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक सामान्य नागरिकांना 6.8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.3 टक्के व्याज एका वर्षाच्या एफडीवर देते.
महत्वाच्या बातम्या:
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
