Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce : दोघांचा एकाचदिवशी सोशल मीडियातून देवाकडे धावा अन् धनश्री-चहलच्या नात्यातील चर्चित गुपित सुद्धा बाहेर आलं!
22 डिसेंबर 2020 रोजी धनश्री आणि युझवेंद्रचे लग्न झाल्याची माहिती आहे. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce : क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे बरेच दिवस चर्चेत होते. आता दोघांचा घटस्फोट निश्चित झाला आहे. एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट कायदेशीररित्या अंतिम झाला आहे. आज युजवेंद्र आणि धनश्रीला मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
युझवेंद्र चहलने पोस्ट लिहिली
दरम्यान, युझवेंद्र आणि धनश्रीने सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट केली आहे. युझवेंद्र चहलने पोस्ट करून लिहिले आहे की, 'देवाने माझे रक्षण केले आहे जे मी मोजू शकत नाही. म्हणून मला फक्त त्या वेळा आठवतात जेव्हा मी वाचलो होतो, ज्याबद्दल मला माहितही नाही. मला माहीत नसतानाही माझ्यासोबत असल्याबद्दल देवाचे आभार.
Yuzi Chahal's Instagram story. pic.twitter.com/mlEGpPOLLO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 20, 2025
धनश्री वर्माची पोस्ट सुद्धा व्हायरल झाली
तर धनश्रीने लिहिले की, 'तणावापासून भाग्यवान होण्यापर्यंत. देव तुमच्या काळजीचे आनंदात रूपांतर कसे करतो हे किती आश्चर्यकारक आहे? जर तुम्ही आज एखाद्या गोष्टीबद्दल तणावात असाल तर जाणून घ्या की तुमच्याकडे एक पर्याय आहे. तुम्ही एकतर टेन्शन घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःला देवाला अर्पण करू शकता आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करू शकता. देव तुमच्या भल्यासाठी सर्व गोष्टी एकत्र करू शकतो यावर विश्वास ठेवण्याची शक्ती आहे.
22 डिसेंबर 2020 रोजी धनश्री आणि युझवेंद्रचे (Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce) लग्न झाल्याची माहिती आहे. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांचे डान्स व्हिडिओही चर्चेत होते. मात्र, या दोघांमध्ये बराच काळ मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. या बातम्यांवर धनश्री आणि युझवेंद्र यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.
View this post on Instagram
इतर महत्वाच्य बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
