Shani-Rahu Yuti 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर शनी-राहूची मीन राशीत होणार युती; 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, चौफेर होणार धनलाभ
Shani-Rahu Yuti 2025 : तब्बल 30 वर्षांनतंर राहू आणि न्यायदेवता शनी ग्रह एकत्र येणार आहेत. यामुळे काही राशींसाठी हा फार सुवर्णकाळ असणार आहे.

Shani-Rahu Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. या दरम्यान ग्रहांची त्यांच्या मित्र आणि शत्रू ग्रहाबरोबर युती पाहायला मिळते. तसेच, याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम पाहायला मिळतात. आता तब्बल 30 वर्षांनतंर राहू (Rahu) आणि न्यायदेवता शनी (Shani Dev) ग्रह एकत्र येणार आहेत. यामुळे काही राशींसाठी हा फार सुवर्णकाळ असणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
शनी-राहूची युती केव्हा होणार?
सनातन धर्मानुसार,सध्या राहू ग्रह मीन राशीत भ्रमण करत आहे. तर, कर्मफळदाता शनी देवसुद्धा 29 मार्च रोजी मीन राशीत युती करणार आहे. त्यामुळे या कालावधीत दोन शक्तिशाली ग्रहांची युती होणार आहे. याचा अनेक राशींना चांगलाच लाभ होणार आहे. तसेच, मार्चनंतर या राशींचे प्रगतीचे योग जुळून येणार आहेत. या तीन भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी-राहूच्या युतीचा काळ फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत चांगली पदोन्नती मिळेल. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचा देखील मोठा विस्तार झालेला पाहायला मिळेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला जर एखाद्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवू शकतात. तसेच, नवीन प्रॉपर्टी खरेदी करु शकता. राहू-शनीची तुमच्यावर कृपा असल्या कारणाने कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाहीत. या काळात भावा-बहिणींचा तुम्हाला चांगला पाठिंबा पाहायला मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी राहू आणि शनीची युती फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमची संवादशैली अप्रतिम दिसून येईल. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या बोलण्यामुळे कोणीही सहज दुखवू शकतं. या काळात तुम्हाला संतान सुख देखील मिळण्याची शक्यता आहे. मित्रांबरोबरचा काळ तुमचा चांगला जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















