कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
लहू मामलेदार हे कामानिमित्त बेळगावला आले असताना खडे बाजारमधील शिवानंद लॉजकडे जात होते. लॉजकडे जात असताना त्यांच्या कारचा रिक्षाला स्पर्श झाला.

सॉरी म्हणून आमदार गेले, तरी रिक्षाचालकाकडून पाठलाग
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार लहू मामलेदार हे कामानिमित्त बेळगावला आले असताना खडे बाजारमधील शिवानंद लॉजकडे जात होते. लॉजकडे जात असताना त्यांच्या कारचा रिक्षाला स्पर्श झाला. या घटनेत रिक्षाला काही झालं नसल्याने मामलेदार यांनी सॉरी म्हणत कार घेऊन निघून गेले. लॉजसमोर येताच कार पार्किग करत असताना रिक्षा चालकाने पाठलाग करत आला होता. त्याने लहू मामलेदार कारमधून उतरताच भांडणाला सुरुवात करत बेदम मारहाण केली.
रिक्षा चालकावर खुनाचा गुन्हा दाखल
मारहाणीचा प्रकार लक्षात येताच लॉज चालकांसह उपस्थित धावले. थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाही रिक्षाचालकाने मारहाण सुरुच ठेवली. यानंतर जमावाने आमदारांना बाजूला केल्यानंतर लॉजच्या पायऱ्या चढत असताना अचानक कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रिक्षा चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे उत्तरीय तपासणीत स्पष्ट होणार आहे.
कोण आहेत लहू मामलेदार?
लहू मामलेदार 2012 ते 17 या कालावधीत गोव्यात फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मामलेदार तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, पण डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला. जानेवारी 2022 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

