Maharashtra Live Updates: पुण्यात GBSचे एकाच दिवशी 2 मृत्यू; मृतांची संख्या 11 वर , दहावी बोर्डाच्या परीक्षांना आजपासून सुरुवात , ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Live blog: महाराष्ट्र, देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींना वेग, 'ऑपरेशन टायगर'ची हवा.

Background
Maharashtra Live blog: राज्यातील 'ऑपरेशन टायगर'ची सध्या जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील कोल्ड वॉर चर्चेचा विषय ठरत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता या आज शपथ घेणार आहेत. कुंभमेळ्यातील नदीच्या पाण्याविषयी धक्कादायक अहवाल. टीम इंडिया आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अभिनायाला सुरुवात करत आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशच्या संघाशी आहे.
Nashik News : नाशिक जिल्हा न्यायालयासमोर दोन गटात तुंबळ हाणामारी
नाशिक : जिल्हा न्यायालयासमोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुष एकमेकांना पोलिसांसमोरच भिडले. पुरुषांकडून महिलांनाही मारहाण करण्यात आली. जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारा समोरच हाणामारी झाल्यान मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनाही हाणामारी करणाऱ्यांनी जुमानले नाही.
मुंबई-गोवा हायवेसंदर्भात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार : शिवेंद्रसिंहराजे भोसले
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे आज मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. ही पाहणी करत असताना त्यांनी नागोठणेजवळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाजवळ थांबून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर आपण कारवाई करणार असल्याची सूचना दिल्याची माहिती दिली. यानंतर आता महामार्गावरील काम कशा पद्धतीने सुरू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
























