Ladki Bahin Yojana : 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार का? नेमका कधी होणार निर्णय?
ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही, मात्र आता ज्यांचं वय 21 वर्षे पूर्ण झालेल आहे, अशा महिलांना लाभ द्यायचा की नाही? याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घ्यावा लागणार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) आणखी एक महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घ्यावा लागणार आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही, मात्र आता ज्यांचं वय 21 वर्षे पूर्ण झालेल आहे, अशा महिलांना लाभ द्यायचा की नाही? याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घ्यावा लागणार आहे. आतापर्यंत वय 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळत आहे. नव्याने ज्यांचं वय वर्ष 21 पूर्ण होणार आहे त्यांना लाभ द्यायचा की नाही यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय होणार आहे.
लाडकी बहिण योजना सुरू झाली त्यावेळी 21 वर्षे पूर्ण नव्हते, मात्र आता 21 वर्षे पूर्ण झालेले आहेत. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा महिलांना लाभ देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत नव्याने निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजाराचा लाभ दिला जातो. 21-65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होतात.
जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ
महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला होता. जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून स्क्रूटिनी सुरु करण्यात आली आहे. या स्क्रूटिनीसाठी परिवहन विभाग, कृषी विभागाची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय आयकर विभागाची देखील मदत घेतली जात आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असं सांगितलं आहे. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसणार नाहीत त्यांचा लाभ मात्र स्थगित केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावं कमी करण्यात आली होती. आता नव्याने 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे.वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर, 1500 रुपये बंद होणार, दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
