Numerology : 'प्राण जाए पर वचन ना जाए', 'या' जन्मतारखेचे लोक असतात प्रचंड विश्वासू, दिलेला शब्द पाळतातच
Numerology Of Mulank 4 : ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.

Numerology Of Mulank 4 : ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे,राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव आपल्याला कळतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात. त्यानुसार, आज आपण मूलांक (Mulank) 4 च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो.
कसा असतो मूलांक 4 चा स्वभाव?
असं म्हणतात की, या तारखेला जन्मलेले लोक फार विश्वासू आणि मेहनती असतात. हे लोक आपलं संपूर्ण आयुष्य मेहनतीने आणि कष्टाने जगतात. तसेच, असं म्हणतात की, या जन्मतारखेच्या लोकांना शिस्तबद्ध पद्धतीने राहायला आवडतं. तसेच, या लोकांना प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवायला आवडते. तसेच, या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव फार शांत आणि स्थिर असतो. आलेल्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे यांना बरोबर कळतं.
प्रचंड विश्वासू असतात
या जन्मतारखेचे लोक वचन पाळण्यात फार पुढे असतात. यांच्यासारखं सिक्रेट किपर कोणी असूच शकत नाही. तसेच, या लोकांची चांगली सवय म्हणजे, हे लोक जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकतात आणि कृतीतून इतरांचा विश्वास संपादन करतात. आजकालच्या काळात असे लोक फार क्वचित असतात. त्यामुळे तुमचे जर मित्र-मैत्रीण कोणी या जन्मतारखेला जन्मलेले असतील तर त्यांचा आदर करा.
जबाबदार असतात
या जन्मतारखेच्या लोकांना आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव असते. त्या दृष्टीने हे प्रचंड मेहनत करतात. तसेच, आपल्या कुटुंबियांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. यांना इतरांप्रमाणे टाईमपास करायला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा तो वेळ ते आपल्या शारीरिक स्वास्थ्याला देणं पसंत करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















