29 लाखांचं सोनं ते 53 लाखांची LIC, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडे किती आहे संपत्ती?
Delhi CM Rekha Gupta Welth : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची एकूण संपत्ती (Total assets) किती आहे? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Delhi CM Rekha Gupta Welth : देशाच्या राजधानीत 27 वर्षानंतर भाजपची (BJP) सत्ता आली आहे. यानंतर गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु होती. अखेर आज रेखा गुप्ता (Delhi CM Rekha Gupta) यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गुप्ता यांच्या रुपानं दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्रीपदी महिला मिळाली आहे. दरम्यान, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची एकूण संपत्ती (Total assets) किती आहे? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
29 लाख रुपये किमतीचे सोने व इतर दागिने
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोने आणि एलआयसी विम्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या एकूण मालमत्तेत सुमारे 29 लाख रुपयांचे सोने आणि 53 लाख रुपयांची एलआयसी पॉलिसी यांचा समावेश आहे. myneta.com वर उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीच्या नवीन सीएम रेखा गुप्ता यांच्याकडे सुमारे 225 ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत सुमारे 18 लाख रुपये आहे. त्यांच्या पतीकडे 135 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 11 लाख रुपये असल्याची माहिती आहे. अशाप्रकारे त्यांच्याकडे एकूण 29 लाख रुपये किमतीचे सोने व इतर दागिने आहेत.
अनेक एलआयसी पॉलिसींमध्येही गुंतवणूक
रेखा गुप्ता आणि त्यांच्या पतीनेही अनेक एलआयसी पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्या सर्व LIC पॉलिसींची एकूण किंमत 53.68 लाख रुपये आहे. याशिवाय वेगवेगळ्या शेअर्स आणि बाँडमध्ये 9.29 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर त्यांच्या कुटुंबाच्या विविध बँकांमध्ये एकूण 72 लाख रुपयांच्या ठेवी आहेत.
एकूण मालमत्ता किती?
रेखा गुप्ता यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे की, त्यांचे दिल्लीतील रोहिणी भागात सेक्टर-28 मध्ये एक घर आहे, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत 50 टक्के भागीदार आहे. याशिवाय दिल्लीतील शालीमार बागेतही त्यांची स्थावर मालमत्ता आहे. अशाप्रकारे त्यांची एकूण स्थावर मालमत्ता 2.60 कोटी रुपयांची आहे. रेखा गुप्ता यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 4 लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकूण 5.31 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांनी मेरठच्या चौधरी चरण सिंग विद्यापीठातून एलएलबीची पदवी प्राप्त केली आहे. त्याच्याकडे फक्त एकच कार आहे, ती म्हणजे मारुतीची XL6.
महत्वाच्या बातम्या:
मै रेखा गुप्ता ईश्वर की... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी 4 थ्यांदा महिला; राज्यपालांनी CM सह 6 आमदारांना दिली मंत्रिपदाची शपथ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

