Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
Aurangzeb Tomb Row : छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे.

Aurangzeb Tomb Row : गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील (Khultabad) कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली आहे. मराठवाड्यातही (Marathwada) तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए (NIA) दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात दाखल झाले आहे. या पथकाकडून खुलताबाद परिसराची पाहणी करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसंच १७ मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. त्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. नागपूरसह मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई
दरम्यान, नागपुरात सोमवारी दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनेने राज्याची उपराजधानी हादरली आहे. या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिक ही जखमी झाले आहेत. नागपूर हिंसाचार प्रकरणात (Nagpur violence) सायबर पोलिसांनी (Police) मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नागपूर पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत. आतापर्यंत 90 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या नागपूरमध्ये तणाव पूर्ण शांततेचे वातावरण आहे. नागपूरमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी नमाजानिमित्त शहरात पोलीस अलर्ट मोडवर आहेत. नागपुरात मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागपुरात चौकाचौकात पोलिसांचा जागता पहारा पाहायला मिळत आहे. शहरात पुन्हा तणाव टाळण्यासाठी नागपूर पोलीस डोळ्यात तेल ओतून उभे आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

