शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
श्रेयने घराच्या खिडक्यांना प्लायवूड व चिकटपट्टी लावून सील केले होते आणि बाहेर सावधगिरीची सूचना लिहून ठेवली होती.

पालघर : राज्यातील अनेक ठिकाणी तणाव, प्रेम प्रकरण किंवा कर्जबाजारीपणामुळे तरुणाईकडू जीवन संपवल्याच्या घटना घडताना दिसून येते. विशेष म्हणजे काही वेळा तरुण शेतकरी देखील नापिकी, अतिवृष्टी किंवा कर्जबाजारीपणामुळे गळफास घेतात. गळफास घेऊन किंवा औषध प्राशन करुन जीवन संपवण्यात येते. मात्र, वसई पूर्वेत एकायुवकाने चक्क कार्बन मोनॉक्साईड सेवन करुन जीवन संपवल्याची धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. वसई पूर्वेतील स्पॅनिश व्हिला येथील बंगल्यात श्रेय अग्रवाल (27) या तरुणाने कार्बन मोनॉक्साईड वायू प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पहिल्यादांच अशी कुणी तरी आत्महत्या केल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. दोन दिवसांपासून श्रेयचा संपर्क होत नसल्याने त्याच्या बहिणीने मुंबई पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांच्या (Police) शोध मोहिमेत वसईतील बंगल्यात त्याचा मृतदेह आढळला.
श्रेयसच्या मृत्यूची पद्धत पाहून पोलिसांचे डोळे चक्रावले आहेत. कारण, त्याने मृत्यूपूर्वी भलीमोठी चिठ्ठी लिहून आणि आपल्या मृत्यूमुळे कुणालाही इजा होऊ नये याची काळजी घेत आपले जीवन संपवले. श्रेयने घराच्या खिडक्यांना प्लायवूड व चिकटपट्टी लावून सील केले होते आणि बाहेर सावधगिरीची सूचना लिहून ठेवली होती. त्याने दोन्ही हातांना सिलेंडर बांधून हेल्मेट घातले होते आणि नळीच्या साहाय्याने विषारी वायू घेत आत्महत्या केली. तो गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी अग्निशमन दलास पाचारण केले होते. अखेर अग्निशमन दल व पोलिसांनी घर उघडून मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या घरात पाच कार्बन मोनॉक्साईड सिलेंडर सापडले असून, ते कुठून आणले होते याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

