Aurangzeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरील वादानंतर एनआयएचं पथक दाखल
खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपुरात राडा झाला. त्यानंतर मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झालंय. परभणी, जालना, नांदेडमध्येही संशयित हालचालींवर एनआयए पथकाचं लक्ष असणारे. एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.
औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयए पथक संभाजीनगरात दाखल
खुलताबाद परिसराची पाहणी, जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपुरात दंगल झाली. मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.























