Nagpur News: चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडी जागीच मृत्यू; नागपुरातील घटना
Nagpur News : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय हर्षिता चौधरी या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Nagpur News : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय हर्षिता चौधरी या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर लगतच्या गुमगाव येथील वेणा नदीच्या पात्रातील ही घटना असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, 15 ते 20 भटक्या कुत्र्यांनी गुमगाव ते डोंगरगाव रस्त्यावरील वेणा नदीच्या पुलाखाली मुलीवर हल्ला केल्यानंतर त्यात तीला अक्षरक्ष: रक्तबंबाळ केलं. दरम्यान त्यातच त्या मुलीचा जीव गेला असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नेहमीप्रमाणे हर्पीताची आजी आणि आई नदीवर धुणे धुवायला नदीवर गेल्या असतील,याच विचाराने हर्षिता सुद्धा खेळता खेळता नदीवर एकटीच गेली. त्यातच नदीच्या पुलाखाली नेहमीच राहत असलेल्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्यानंतर हर्षिताचा मृत्यू झाला असावा. असा अंदाज आहे.
कुटुंबियांची शोधाशोध, अन् हर्षिता पूलाखाली रक्तबंबाळ स्थितीत आढळली
दरम्यान, दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास हर्षिता घरी दिसत नसल्याने आई लक्ष्मी यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. परंतू शोधाशोध केल्यानंतरही हर्षिता दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी इकडेतिकडे शोध घेतला. काहींनी नदीकडे धाव घेतली. तर हर्षिता तिथे रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत पडलेली दिसली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून या भटक्या कुत्र्यांच्या तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर जिल्ह्यात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत बघायला मिळाली आहे.
चार वर्षात 1 कोटी 60 लाख भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांची वारंवार चर्चा होत असते. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळलेले नागरीक आणि श्वान प्रेमींमध्ये वाद झडत असतात. भारतात भटक्या कुत्र्यांची संख्या चार ते सहा कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. संसदेत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2019 ते 2022 या काळात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या किमान एक कोटी 60 लाख घटनांची नोंद करण्यात आली आहेय याचाच अर्थ या कालावधीत भटके कुत्रे चावल्याच्या दररोज किमान 10 हजार घटनांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली. रेबीज या आजारामुळे दरवर्षी 21 हजार मृत्यू होतात, यातील 99 टक्के जणांना रेबीज लागण कुत्र्यांमुळे होते अशी जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

