NZ vs PAK T20 : पाकिस्तान चारी मुंड्या चित! चौथ्या टी-20 मध्ये लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका घातली खिशात
New Zealand vs Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे.

New Zealand Beat Pakistan in 4th T20 : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा सामना तौरंगा येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला, जिथे पाकिस्तानला लाजिरवाणा पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात सुरुवातीला पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांनी माती खाल्ली आणि नंतर फलंदाजांनी नांगी टाकली. या पराभवासह, पाकिस्तान संघाने मालिकाही गमावली आहे, कारण न्यूझीलंडने 3-1 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.
Finn Allen and Michael Bracewell's knocks powered New Zealand to a formidable total against Pakistan in the fourth T20I 💥👏#NZvPAK 📝: https://t.co/gP7u94l6Rh pic.twitter.com/8HJZLk7iEs
— ICC (@ICC) March 23, 2025
न्यूझीलंडचा तडाखा!
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 220 धावा केल्या. यादरम्यान, टिम सेफर्ट आणि फिन ऍलन यांनी संघाला धमाकेदार सुरुवात दिली. टिम सेफर्टने 22 चेंडूत 44 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, फिन ऍलनने फक्त 19 चेंडूत अर्धशतक झळकावले, जरी पुढच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. यानंतर, मायकेल ब्रेसवेलने नाबाद 46 धावा आणि डॅरिल मिशेलने 29 धावा करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
New Zealand showed imperious form against Pakistan to secure an unassailable T20I series lead 👏#NZvPAK 📝: https://t.co/gP7u94l6Rh pic.twitter.com/kr57rvpPFz
— ICC (@ICC) March 23, 2025
दुसरीकडे, पाकिस्तानकडून हरिस रौफ सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत 27 धावा देऊन 3 फलंदाजांचे बळी घेतले. त्याच वेळी, अबरार अहमदने 2 आणि अब्बास आफ्रिदीने 1 विकेट घेतली. पण शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान सर्वात महागडे ठरले. दोन्ही गोलंदाजांनी त्यांच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये प्रत्येकी 49 धावा दिल्या.
पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरूवात खूपच खराब झाली. कारण कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही आणि त्यांनी एकामागून एक विकेट गमावल्या. पाकिस्तानचा अर्धा संघ पॉवरप्लेमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानंतर न्यूझीलंडने सामन्यावर पूर्णपणे कब्जा केला आणि पाकिस्तानला काही वेळातच ऑलआउट केले. पाकिस्तान फक्त 16.2 षटके खेळू शकला आणि 105 धावा करून ऑलआऊट झाला.
हे ही वाचा-
IPL लिलावात 'अनसोल्ड' राहिलेल्या 'लॉर्ड शार्दुल'चं नशीब चमकले! अचानक मागच्या दरवाजाने मारली एन्ट्री
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

