नागपूर हिंसाचार प्रकरण! शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी नेमली समिती
नागपूरच्या (Nagpur) तणावग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसनं (Congress ) पुढाकार घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी समिती नेमली आहे.

नागपूर : नागपूरच्या (Nagpur) तणावग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसनं (Congress ) पुढाकार घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी समिती नेमून ज्येष्ठ नेत्यांवर याची जबाबदारी सोपवली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची समिती नागपूरात जाऊन दंगलग्रस्त भागाची पाहणी करुन स्थानिकांशी चर्चा करणार आहे. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
समितीत ज्येष्ठ नेत्यांचा समावेश
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमलेल्या समितीत ज्येष्ठ नेते गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण यांचा समावेश आहे. नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील हे समन्वयक आहेत.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण गरम
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. नागपुरात सोमवारी दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनेने राज्याची उपराजधानी हादरली आहे. शांतताप्रिय अशी ओळख असलेल्या शहरात कधी नव्हे ते ऐवढया मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली असून सध्या या घटनेचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत. सध्या नागपूरमध्ये तणाव पूर्ण शांततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील शाळा आजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरीकडे, सध्या तरी नागपूरच्या 11 पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील काही भागात जी संचारबंदी लागू करण्यात आली आहे ती अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी 90 जणांना अटक
नागपूर हिंसाचार प्रकरणी नागपूर पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत. आतापर्यंत 90 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र दंगलखोर अजूनही लपून बसले आहेत. त्यांची ओळख पटवण्यासाठी नागपूर पोलिसांचा सायबर सेल कामाला लागले आहे. सायबर सेल उपलब्ध सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज, मीडिया फुटेज, सोशल मीडिया पोस्ट, सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचा डाटा बेस तयार करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nagpur violence: नागपूर दंगलीबाबत पोलिसांना महत्त्वाचा क्लू सापडला, बांगलादेशमधील फेसबुक अकाऊंटवरुन नेमका काय मेसेज आला?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

