The Diplomat Box Office Collection Day 7: 'सिकंदर'ची हवा अन् 'छावा'चं तुफान, यात गपचूप धुवांधार कमाई करतोय जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट'; कमाईचा आकडा ऐकाल तर...
The Diplomat Box Office Collection Day 7: विक्की कौशलच्या 'छावा'समोर जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसा कमाई करतोय? सविस्तर जाणून घ्या...

The Diplomat Box Office Collection Day 7: एकीकडे 'छावा' (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालतोय, तर दुसरीकडे येत्या 30 मार्चला रिलीज होणाऱ्या सिकंदरनं (Sikandar) सर्वांना वेड लावलंय. भाईजानचा आगामी सिनेमा पाहण्यासाठी चाहते सज्ज झाले आहेत. रिलीजच्या आधीपासूनच सिकंदरनं आपली हवा निर्माण केली आहे. असं असलं तरी 'छावा' आणि 'सिकंदर'च्या वादळात एक चित्रपट गुपचूप येऊन आपलं काम करत आहेत. जॉन अब्राहमचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'छावा'च्या वादळातही 'द डिप्लोमॅट' (The Diplomat) तग धरुन बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे.
जॉन अब्राहमच्या 'द डिप्लोमॅट'चं समीक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला आहे. या चित्रपटासमोर, 'छावा'सारख्या चित्रपटाचं आव्हान होतं, आधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'छावा'समोर 'द डिप्लोमॅट' चांगले पैसे कमवत आहे.
जॉन आणि सादिया खतीब यांच्या चित्रपटाची सुरुवात सरासरी होती. पण विकडेजच्या दिवसातही चित्रपटाची कमाई फारशी कमी झाली नाही. उलट, चित्रपटाला पॉजिटिव वर्ड ऑफ माऊथचा फायदा झाला आणि त्यामुळे 'द डिप्लोमॅट' चांगली कमाई करत राहिला. चित्रपटाच्या कालच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे, म्हणजेच 7 व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत, जाणून घेऊया चित्रपटां आतापर्यंत किती कमाई केली? याबाबत सविस्तर...
View this post on Instagram
'द डिप्लोमॅट'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
अधिकृत आकडेवारीनुसार, जॉन अब्राहमच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी 4.03 कोटी, दुसऱ्या दिवशी 4.68 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 4.74 कोटी रुपये कमावले. चित्रपटानं चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी अनुक्रमे 1.53, 1.51 आणि 1.52 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे एकूण 18.01 कोटी रुपये कमावले.
तर, आज रात्री 10:25 वाजेपर्यंत, चित्रपटाने 1.35 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची एकूण कमाई 19.36 कोटी रुपये झाली आहे. हे आकडे अद्याप अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
'द डिप्लोमॅट'चं वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
सॅक्निल्कच्या मते, या चित्रपटानं फक्त 6 दिवसांत जगभरात 3.85 कोटी रुपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. जर आपण यामध्ये देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन जोडलं तर ते 23.21 कोटी रुपये होतं.
'द डिप्लोमॅट' चित्रपटाच्या रिलीजसाठी फक्त 9 दिवस शिल्लक
सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर, 'द डिप्लोमॅट'ला स्क्रीन्स शिल्लक ठेवणं देखील खूप कठीण होईल. अशा परिस्थितीत चित्रपटाला कमाई करण्यासाठी खूपच कमी वेळ शिल्लक आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचं बजेट सुमारे 50 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत, चित्रपट त्याच्या बजेटच्या जवळपासही पोहोचू शकतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

