मुकेश अंबांनींचा मोठा प्लॅन! 65 हजार कोटी रुपये खर्च करणार, 2 लाख 50 हजार तरुणांना मिळणार नोकऱ्या
आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 65,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहेत. यामुळं तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहेत.
Mukesh Ambani : आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 65,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक (Investment) करणार आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd) आंध्र प्रदेशमध्ये 500 कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी पुढील 5 वर्षांत 65000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. मुकेश अंबानींच्या या गुंतवणुकीमुळं 2 लाख 50 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत.
प्रत्येक प्लांटमध्ये 130 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक प्लांटमध्ये 130 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. राज्यातील नापीक जमिनीवर हे प्रकल्प उभे केले जाणार आहेत. राज्य सरकारच्या अंदाजानुसार, यातून 250,000 लोकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आरआयएलच्या स्वच्छ ऊर्जा उपक्रमाचे प्रमुख अनंत अंबानी आणि आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश, जे रोजगार निर्मितीवरील राज्य मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख आहेत, यांच्यात मुंबईत या योजनेला अंतिम रुप देण्यात आले आहे. हा करार अंतिम करण्यासाठी, मंगळवारी विजयवाडा येथे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत RIL आणि आंध्र प्रदेश उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. आंध्र सरकारने राज्याच्या नुकत्याच अधिसूचित केलेल्या एकात्मिक स्वच्छ ऊर्जा धोरणांतर्गत जैवइंधन प्रकल्पांसाठी प्रोत्साहने सुरू केली आहेत. यामध्ये पाच वर्षांसाठी कंप्रेस्ड बायोगॅसवरील स्थिर भांडवली गुंतवणुकीवर 20 टक्के भांडवली सबसिडी तसेच राज्य GST आणि पाच वर्षांसाठी वीज शुल्काची संपूर्ण परतफेड समाविष्ट आहे.
2.50 लाख नोकऱ्या निर्माण होणार
रोजगार निर्मिती हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती कंपनी प्रशासनाने दिली आहे. आम्ही गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आमच्या एकात्मिक स्वच्छ ऊर्जा धोरणामध्ये अनेक प्रोत्साहने आणली आहेत. रिलायन्सने याआधीच राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि आम्ही त्यांना आणखी गुंतवणूक करताना पाहण्यास उत्सुक आहोत. 250,000 नोकऱ्यांच्या निर्मितीचे आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी कौतुक केले आहे. राज्यातील तरुणांसाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरेल, असे ते म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरआयएल केवळ सरकारी नापीक जमिनींचे पुनरुज्जीवन करणार नाही तर शेतकऱ्यांसोबत काम करेल आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना ऊर्जा पिकांच्या लागवडीचे प्रशिक्षण देईल.
महत्वाच्या बातम्या: