Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता सतीश भोसलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

Beed:सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसले अटकेत आहे. सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यादरम्यान आता सतीश भोसलेचा मुक्काम पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत असणार आहे.
काही दिवसांपूर्वीच वनविभागाने खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवला होता. वनविभागाच्या ज्या जागेवर खोक्याने आपले बस्तान बसवले होते ती आलिशान इमारत त्याशेजारी असणारे खोक्याचे ऑफिस दोन्ही पाडण्यात आले आहेत. दरम्यान गुन्हेगारीचा इतहास असणारा खोक्या भाई गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहे. भाजपचा पदाधिकारी आणि भाजप आमदार सुरेश धसांचा कट्टर कार्यकर्ता अशी त्याची ओळख आहे.
खोक्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत
भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याने शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती .यानंतर सतीश भोसले ची दहशत मोठ्या चर्चेचा विषय बनली .बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याची दहशत समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा नोंदविला आहे. तर शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी देखील सतीश भोसले वर दुसरा गुन्हा नोंदविला गेला. या गुन्ह्यात सात दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता सतीश भोसलेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा गुन्हेगारीचा इतिहास
बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये सतीश भोसले याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
1. कलम 307 (IPC 307) - 2021 प्रयत्नात्मक खून (Attempt to Murder)
2. कलम 498A (IPC 498A) - 2020 कौटुंबिक गुन्हा
3. कलम 304 (IPC 304) - 2020 गंभीर गुन्हा ठार मारण्याचा प्रयत्न नसताना घडलेला मृत्यु (Culpable Homicide Not Amounting to Murder)
4. आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल आहे.
5. शिरूर पोलिस स्टेशन मारहाणीचा गुन्हा..
6. BNS 115(2) - प्राणघातक हल्ला (गंभीर)
7. BNS 118(1) - जबरदस्तीने संपत्ती मिळवणे
8. BNS 189(2) - शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणे
9. BNS 190 - फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर
10. BNS 191(2) - खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करणे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

