Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्तन पकडणे आणि पायजाम्याची नाडी तोडणे हे बलात्कार नाही तर लैंगिक छळाचे गंभीर गुन्हे असल्याचे म्हटले आहे.

Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्तन पकडणे आणि पायजाम्याची नाडी तोडणे हे बलात्कार नाही तर लैंगिक छळाचे गंभीर गुन्हे असल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्ती राम मनोहर मिश्रा यांनी कासगंजच्या पटियाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत ही टिप्पणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये त्यांनी आकाश आणि इतर दोन आरोपींची फौजदारी पुनर्विचार याचिका स्वीकारली आहे. बलात्काराचा प्रयत्न आणि गुन्ह्याची तयारी यातील फरक योग्यरित्या समजून घेतला पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाने आरोपीविरुद्ध कलम 376 (बलात्कार) ऐवजी कलम 354-ब (वस्त्र उतरवण्याच्या उद्देशाने हल्ला) आणि कलम 9/10 (तीव्र लैंगिक अत्याचार) अंतर्गत खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपातील तथ्य बलात्काराचा प्रयत्न सिद्ध करत नाही.
नेमकं प्रकरण काय?
ही घटना 2021 सालची असून कासगंज न्यायालयाने पवन आणि आकाश या दोन आरोपींना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 376 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 18 अंतर्गत खटल्याला सामोरे जाण्यासाठी समन्स बजावले होते. कनिष्ठ न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा प्रयत्न आणि लैंगिक छळाचा खटला मानून समन्स आदेश जारी केला होता. आरोपींनी या आदेशाला आव्हान दिले होते आणि उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती, असा युक्तिवाद करत की तक्रारीच्या आधारे, हा खटला कलम 376 आयपीसी (बलात्कार) अंतर्गत येत नाही आणि तो फक्त कलम 354 (ब) आयपीसी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत येऊ शकतो, जो न्यायालयाने स्वीकारला आहे.
न्यायालयाने काय म्हटले?
न्यायालयाने फौजदारी पुनरीक्षण याचिका अंशतः स्वीकारली आणि म्हटले की, आरोपी पवन आणि आकाशवर लावण्यात आलेले आरोप आणि प्रकरणातील तथ्ये या प्रकरणात बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा ठरत नाहीत. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपी पवन आणि आकाश या दोघांनी 11 वर्षांच्या पीडितेचे स्तन धरले आणि आकाशने तिच्या पायजाम्याची नाडी तोडली आणि तिला पुलाखाली ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु रस्त्याने जाणाऱ्या / साक्षीदारांच्या हस्तक्षेपामुळे आरोपी पीडितेला सोडून घटनास्थळावरून पळून गेले. त्याने बलात्काराचा गुन्हा केला नाही. याबाबत असा कोणताही पुरावा नाही ज्यावरून असे अनुमान काढता येईल की, आरोपीचा पीडितेवर बलात्कार करण्याचा हेतू होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. तर पायजाम्याची कपड्याची नाडी तोडल्यानंतर आरोपी स्वत: अस्वस्थ झाल्याचे नोंदवलेल्या जबाबावरून स्पष्ट असल्याचे देखील न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणात उच्च न्यायालयाने आरोपीवर कलम 354-ब आयपीसी (वस्त्र उतरवण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 9/10 (तीव्र लैंगिक अत्याचार) अंतर्गत खटला चालवण्याचे निर्देश दिले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

