Nashik Crime : रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
Nashik Crime : नाशिक शहरात बुधवारी दिवसभर रंगपंचमीचा उत्साह दिसून आला. मात्र, रात्री दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले आहे.

Nashik Crime : नाशिक शहरात बुधवारी (दि.19) दिवसभर रंगपंचमीचा (Rangapanchami) उत्साह दिसून आला. मात्र, रात्री दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले आहे. उपनगर (Upnagar) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी (Ambedkarwadi) येथे दोघा सख्ख्या भावांचा टोकळ्यांकडून धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रंगपंचमीच्या निमित्ताने जल्लोषाला दिवसभर संपूर्ण शहरात उधाण आलेले होते. रात्री शहर झोपी जात असताना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडीमध्ये एका सार्वजनिक शौचालयासमोर कोयतेधारी हल्लेखोरांनी मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव या दोघा सख्ख्या भावांवर हल्ला चढवला.
मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी
एकापेक्षा अधिक वार केल्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात दोघे कोसळले. ही बाब परिसरातील युवकांच्या लक्षात आली. यानंतर, दोघांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्षपदावर कार्यरत होते.
5 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळतच शासकीय जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव एकत्र आला होता. संशयित आरोपींच्या शोधासाठी 4 पथके रवाना करण्यात आली होती. आता नाशिक दुहेरी खूनप्रकरणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. खून करण्याआधी काय घडले होते? याचा पोलीस तपास करत आहेत. संशयित आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

