बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
क्रिकेट विश्वात नवी सुरुवात करण्यासाठी सौदी अरेबिया मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवणार असल्याची माहिती समोर आली आहे..

Saudi Arabia T20 League : इंडियन प्रीमियर लीगमुळे जगभरात क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढली असे म्हणणे योग्य आहे का? कदाचित होय, आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू लाखो कोटींवर पोहोचली आहे आणि आता जगातील अनेक देशांतील फ्रँचायझी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, सौदी अरेबिया टी-20 लीगमध्ये 4,300 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. या लीगचा फॉरमॅट टेनिस ग्रँड स्लॅमप्रमाणे ठेवला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र 'द एज'ने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि SRJ स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट्समध्ये अशा प्रकारच्या T20 लीगबाबत गेल्या एक वर्षापासून चर्चा सुरू आहे.
या लीगचा जगभरातील इतर लीगवर कोणताही परिणाम होणार नाही
मीडिया रिपोर्टनुसार, “या नव्या लीगच्या संकल्पनेवर एका वर्षाहून अधिक काळ काम सुरू आहे. ऑस्ट्रेलियात न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया संघाकडून खेळणारा अष्टपैलू नील मॅक्सवेल याने ही कल्पना मांडली होती. मॅक्सवेल सध्या ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स या व्यवस्थापन पाहातात. या लीगचा जगभरातील इतर लीगवर कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
छोट्या देशांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल
क्रिकेटचे भविष्य सुरक्षित करणे आणि या खेळाला प्रोत्साहन देणे हा या लीगचा उद्देश आहे. जो काही निधी जमा होईल,त्यामधून छोट्या देशांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. जे काही संघ तयार होतील, त्यांच्या देशात क्रिकेट खेळण्याासठी खास प्रोत्साहन दिले जाईल. यापैकी एक ऑस्ट्रेलियातही असेल. ही लीग महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंसाठी सुरू होणार आहे. अंतिम सामना सौदी अरेबियात खेळवला जाऊ शकतो.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
