WPL Final 2025 DC vs MI: महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार अंतिम सामना; पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing XI
WPL Final 2025 DC vs MI: महिला प्रीमियर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात दिल्लीने तीनही अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

WPL Final 2025 DC vs MI: महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेत (WPL Final 2025) आज (15 मार्च) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना रंगणार असून भारतीय वेळेनूसार संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. महिला प्रीमियर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात दिल्लीने तीनही अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे, तर मुंबईचा संघ दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे.
2️⃣ 🔝 Teams
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 14, 2025
2️⃣ Great Captains
1️⃣ Trophy 🏆
Who will win the 𝐒𝐮𝐦𝐦𝐢𝐭 𝐂𝐥𝐚𝐬𝐡? 🤔#TATAWPL | #DCvMI | #Final | @DelhiCapitals | @mipaltan pic.twitter.com/OiI9OAt0ge
खेळपट्टी कशी असेल?
ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये आतापर्यंत येथे खेळलेल्या तीन सामन्यांवर नजर टाकली तर सरासरी धावसंख्या 197 धावा आहे. आतापर्यंत तीनही वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे, त्यामुळे अंतिम सामन्यात येथे धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यातील अंतिम सामन्यात आज जास्त धावा होऊ शकतात. तसेच नाणेफेक जिंकणार संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
सामन्यात कोणाचं वर्चस्व राहिल?
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत 7 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यापैकी दिल्लीने चार वेळा आणि मुंबईने तीन वेळा विजय मिळवला आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई आणि दिल्लीचा संघ दोनदा एकमेकांविरुद्ध भिडले. यामध्ये दोन्ही सामन्यात दिल्लीने विजय मिळवला. अंतिम सामन्यात दिल्लीचा वरचष्मा असल्याचे सध्यातरी दिसून येतंय.
Consistency 🤝 Team work 🤝 Performance
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 14, 2025
Our two finalists had that in common on the road to the #Final 🛣
But who will fulfill their quest for glory? 🏆🤔 #TATAWPL | #DCvMI | @DelhiCapitals | @mipaltan pic.twitter.com/MkxmxLcEN9
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
शेफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मारिजाने कॅप, जेस जोनासन, सारा ब्राइस, निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.





















