एक्स्प्लोर
Star anise : 'चक्रफूल' जेवणाची चव वाढवण्यासोबतचं, आरोग्यासाठीही फायदेशीर!
Star anise : आरोग्यवर्धक चक्रफूल!

जेवणात वापरले जाणारे मसाले आरोग्यास उपयुक्त ठरतात. (Photo Credit : unsplash)
1/10

जेवण चविष्ट बनवण्यासाठी घरामध्ये वेलची, मसूर साखर, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, चक्रफूल इत्यादी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. (Photo Credit : unsplash)
2/10

हे मसाले जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे मसाले आरोग्यदृष्ट्याही फार महत्वाचे असतात. (Photo Credit : unsplash)
3/10

खड्या मसाल्यांमध्ये आपण चक्रफूल जेवणात वापरतो. चक्रफूलात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. (Photo Credit : unsplash)
4/10

चक्रफूलामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल यांसारखे पोषक घटक आढळतात, जे आरोग्यास फायदेशीर ठरतात. (Photo Credit : unsplash)
5/10

चक्रफूलात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, त्यामुळे शरीराची जळजळ कमी होते. चक्रफूल पचनासाठी उत्तम मानले जाते. (Photo Credit : unsplash)
6/10

चक्रफूलातील पोषक घटक शरीरातील सर्व घाण काढून टाकण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीरातील डिटॉक्स होते आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. (Photo Credit : unsplash)
7/10

अॅसिडिटीचा त्रास होत असेलेल्या लोकांनी चक्रफूलाचे सेवन करावे. चक्रफूलात आढळणारे घटक अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर करतात. (Photo Credit : unsplash)
8/10

चक्रफूलात व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळते, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. चक्रफूल वजन कमी करण्यास प्रभावी ठरते. (Photo Credit : unsplash)
9/10

रोजच्या जेवणामध्ये 1 ते 2 चिमूटभर चक्रफूल पावडर टाकावी, त्यामुळे जेवणाला चव येते आणि आपले आरोग्यही सुधारते. (Photo Credit : unsplash)
10/10

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)
Published at : 09 Feb 2024 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
