Chhaava : छावा सिनेमा टॅक्स फ्री केल्यास तिकीट किती स्वस्त होतं? अनेक राज्यांची घोषणा; पण खिशावर किती परिणाम?
Chhaava : छावा सिनेमा टॅक्स फ्री केल्यास तिकीट किती स्वस्त होतं? अनेक राज्यांची घोषणा; पण खिशावर किती परिणाम?

Chhaava : अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) प्रमुख भूमिकेत असलेल्या 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केलीये. 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावरील या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांत देशभरात 197.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, मध्य प्रदेश आणि गोवा सरकारने राज्यात चित्रपट करमुक्त केला आहे. महाराष्ट्रातही याची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तसे संकेत दिले आहेत. 'छावा'ची (Chhaava) सर्वाधिक कमाईही महाराष्ट्रातून होत आहे. पण चित्रपट टॅक्स फ्री होण्याचा खरोखरच फायदा होतो का? तिकिटांच्या किमतीत काही फरक पडतो, ज्याचा थेट परिणाम आमच्या खिशावर होतो? चला समजून घेऊयात...
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा'ने सहाव्या दिवशी 32.00 कोटींची कमाई केली आहे. बुधवारी, मुंबईतील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. तर पुण्यात सर्वाधिक 84.50% प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. त्यानंतर हैदराबाद (42.50%), बेंगळुरू (25.00%), लखनौ (22.00%) आणि भोपाळ (21.75%) यांचा क्रमांक लागतो. वरिल तिन्ही शहरांमध्ये चित्रपट सर्वाधिक कमाई करत आहे. दरम्यान, सिनेमा कर मुक्त म्हणजेच टॅक्स फ्री केल्यास काय होतं? जाणून घेऊयात..
डिसेंबर 2018 मध्ये चित्रपटांसाठी दोन GST स्लॅब जाहीर करण्यात आले होते. यामध्ये ₹100 वरील तिकिटांसाठी 18% आणि ₹100 पेक्षा कमी तिकिटांसाठी 12% टॅक्स स्लॅब ठेवण्यात आला होता. हा कर राज्य आणि केंद्र सरकार (राज्य जीएसटी आणि केंद्रीय जीएसटी) यांच्यात विभागलेला आहे. जेव्हा एखादे राज्य चित्रपट 'करमुक्त' बनवते तेव्हा त्याला करमणूक करावर 50% सूट दिली जाते. म्हणजे तिकिटाच्या किमतीनुसार 9% किंवा 6% ची सूट. आता मल्टिप्लेक्स प्रेक्षकांसाठी ₹100 च्या खाली कोणतेही तिकिटे नसल्यामुळे, सवलत 9% असू शकते.
समजून घेऊयात नेमकं काय होतं?
सिनेमा टॅक्स फ्री नसल्यानंतर सिनेमा टॅक्स फ्री झाल्यानंतर
तिकीटाची किंमत 200 रुपये तिकीटाची किंमत - 200 रुपये
यावरचा CGST -18 रुपये यावरचा CGST - 18 रुपये
यावरचा SGST - 18 रुपये यावरचा SGST - 0 रुपये
तिकीटाचा एकूण किंमत- 236 तिकीटाचा एकूण किंमत - 218 रुपये
पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेडचे चीफ प्रोग्रामिंग ऑफिसर राजेंद्र सिंह सांगतात, 'टॅक्स सूट मिळाल्यानंतर चित्रपट अधिक चांगली कामगिरी करेल की नाही, हे त्या चित्रपटावर अवलंबून असते. जीएसटीपूर्वी करमुक्त तिकिटे सिनेमा पाहणाऱ्यांना परवडणारी होती. पण आता एखादा चित्रपट टॅक्स फ्री झाला की प्रेक्षकांच्या खिशाला फारसा फरक पडत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
