एक्स्प्लोर
27 तारखेला अवघे या, राज ठाकरेंच्या बैठकीत मनसैनिकांना सूचना; सांगितलं मनसेचा धमाका कधी होणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या व पक्षातील बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं

Raj thackeray meeting with MNS
1/7

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या व पक्षातील बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं
2/7

आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मनसेच्या पुढील काळातील राजकीय रणनीतीबद्दल आजच्या बैठकीत सूचना केल्या
3/7

येत्या 27 तारखेला मराठी भाषा दिवस साजरा होत असून मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे, या सोहळ्याला सहकुटुंब यावे, असे राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितले.
4/7

राज ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर भाषणात सांगितल्याप्रमाणे आचारसंहितेबाबत मार्गदर्शन केलं. येत्या 9 मार्च रोजी पक्षाचा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड येथे साजरा होईल, त्यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता दिली जाईल असेही राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले
5/7

मनसेचा पाडवा मेळावा यंदा, 30 मार्च रोजी होत आहे. 30 मार्च रोजी गुढीपाडवा असून यंदा पक्षाचा पाडवा मेळावा जोरात करायचा आहे, असे सांगत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना चार्ज केलंय
6/7

दरम्यान, या बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील मार्गदर्शन केले. मध्यंतरी मेळावा झाला होता पक्ष संघटनेच्या माध्यमातून काय करणार याचा लवकरचं निर्णय होईल, काही महत्वाचे बदल होणार आहेत ते लवकर पुढे येतील असे नांदगावकर यांनी म्हटले.
7/7

मनसे पक्षात आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांमध्ये बदल निश्चित होतील, तसे राजसाहेब बोलले होते त्यानुसार होईल असेही नांदगावकर यांनी म्हटलं
Published at : 20 Feb 2025 08:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
भारत
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
