अंजलीताईंच राहू द्या, माझ्यावर खटला दाखल करा, मी पुराव्यासह बोलतो; सुरेश धसांचे धनंजय मुंडेंना चॅलेंज
धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर त्यांचा काही संबंध नाही आला तर, त्यांनी पुन्हा मंत्रीपद स्वीकारवं असे मत आमदार सुरेश धसांनी व्यक्त केले.

Suresh Dhas : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणतात अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणार, पण मी म्हणतो त्यांनी माझ्यावर खटला दाखल करावा, असे म्हणत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडेंना चॅलेंजच दिलं आहे. सुरेश धस .यांनी आज पत्रकार परिष घेत कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्यासंदर्भात माहिती दिली. धनंजय मुंडेंच्या वरदहस्ताने कृषी खात्यात 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप ही यावेळी धस यांनी केला.
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्यांचा जर संतोष देशमुख यांच्या खुनात (Santoh Deshmukh Murder case) काही संबंध नाही आला तर त्यांनी पुन्हा मंत्रीपद स्वीकारवं असे मत भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी व्यक्त केलं. तुम्ही का अलगद चिकटून बसलात? असा सवालही सुरेश धस यांनी केला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्याचा फायदा अजितदादांच्या पक्षाला होत असल्याचेही सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत मी कायम राहणार असल्याचे धस म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला अटक होणं बाकी आहे. माझा फोकस संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच महादेव मुंडे प्रकरण आणि भ्रष्टाचार यावर असल्याचे सुरेश धस म्हणाले. देशमुख कुटुंबियांचा आणि राज्याच्या संपूर्ण जनतेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस माझ्यामागे देखील ठामपणे उभे असल्याचे सुरेश धस म्हणाले.
कृषी विभागातील बदल्यांमध्ये 100 कोटींपेक्षा अधिकचा घोटाळा
कृषी विभागात 300 कोटींचा घोटाळा झाला आहे. तरीदेखील यांचे व्यवहार सुरु असल्याचे सुरेश धस म्हणाले. परळी पोलिसांनी हे सर्व तपासावे असेही धस यावेळी म्हणाले. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे रेट कार्ड आहे. महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती. यांचे CDR काढा. बदल्यांमध्ये 100 कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. वाल्मिक कराडला जिल्ह्याचा बाप आहे असं वाटत होतं असेही धस म्हणाले. हा सगळा एकूण 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. ज्यावेळी सगळा मराठवाडा पाण्याखाली होता, त्यावेळी रश्मीका मांदना आणले होते, असे म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. हार्वेस्टर घोटाळ्यात आकाचे नावच पुढे आलेल्याचे सुरेश धस म्हणाले.




















