एक्स्प्लोर
देशात 200 वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्राला काय? रेल्वे बजेटमध्ये मुंबईसाठी 511 कोटींची तरतूद
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2025 संसदेत सादर केला. त्यात भारतीय रेल्वेसाठी 2025-26 या वर्षात तब्बल 2 लाख 52 हजार 200 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Railway budget 2025 for maharashtra
1/8

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2025 संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातून भारतीय रेल्वेसाठी 2025-26 या वर्षात तब्बल 2 लाख 52 हजार 200 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
2/8

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रालालाही भरगोस निधी देण्यात आला असून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचं कामही या बजेटमधून होत आहे.
3/8

महाराष्ट्रातील एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील प्रकल्पांसाठी 511.48 कोटींची तरतूद केली आहे.
4/8

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
5/8

रेल्वेच्या प्रस्तावित कामांसाठी 4.60 लाख कोटींचा निधी असून, यामध्ये नवीन वर्कशॉप, नवीन डबे, स्टेशन डेव्हलपमंट यांचा समावेश असणार आहे.
6/8

यंदाच्या वर्षी रेल्वे 17 हजार 500 जनरल डबे बनवणार असून प्रवाशांच्या भेटीला 200 वंदे भारत, 100 अमृत भारत आणि 50 नमो भारत ट्रेन येणार आहेत.
7/8

रेल्वे बजेटमधूनन 1 हजार फ्लायओव्हर आणि अंडर पास बनवले जाणार आहेत. तर, संपूर्ण भारतात 7 हजार किमीचा रेल्वे ट्रॅक हा हाय स्पीड ट्रॅक बनवणार आहेत.
8/8

रेल्वे सुरक्षेसाठी 1 लाख 14 कोटींची भरीव गुंतवणूक असून रेल्वेचे यावर्षी संपूर्ण विद्युतीकरणाचे लक्ष आहे, त्यातून 1.6 बिलियन टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्टही रेल्वे ठेवले आहे.
Published at : 01 Feb 2025 06:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
