Success Story: फक्त 5000 रुपयांचा खर्च, 3 लाख रुपयांचा नफा, रताळाच्या शेतीतून शेतकरी मालामाल
Success Story: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील बाभुळगावच्या एका शेतकऱ्याने कमी खर्चाची शेती करुन लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.

Success Story : अलिकडे आपल्या देशातील राज्यातील काही शेतकरी (Farmers) हळूहळू पारंपरिक शेती सोडून नगदी पिके घेत आहेत. पूर्वी शेतीतून कुटुंब चालवणे अवघड होते, आता शेतकरी नगदी पिकांची लागवड करून दुप्पट नव्हे तर चौपट उत्पन्न मिळवत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील बाभुळगावच्या एका शेतकऱ्याने कमी खर्चाची शेती करुन लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. सुधीर चव्हाण (Sudhir Chavan) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याने पारंपारिक शेती सोडून रताळ्याची शेती (sweet potato) करुन लाखो रुपयांचा नफा कमावला आहे.
पंढरपूर येथील बाभूळगावचे शेतकरी सुधीर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी ते पारंपारिक शेती करायचे. त्यामुळं कसा तरी उदरनिर्वाह चालत होते. यानंतर त्यांनी रताळ्याची लागवड सुरू केली. गेल्या 10 वर्षांपासून ते रताळ्याची लागवड करत आहेत. त्यांना रताळ्याचे चांगले उत्पादन होत आहे. त्यातूनही मोठी कमाई होत आहे. सुधीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रताळ्याच्या लागवडीसाठी एकरी 5000 रुपये खर्च येतो पण त्यातून लाखोंची कमाई होते. गेल्या वर्षी त्यांनी दीड एकरात 600 पोती रताळ्याचे उत्पादन घेतले होते. त्याची विक्री करून त्यांना 3 लाख रुपयांचा नफा झाला होता.
रताळ्याच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही
शेतकरी सुधीर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मशागत करण्यापूर्वी ते माती फिरवून शेताची नांगरणी करतो, त्यानंतर रोटाव्हेटरने 2 ते 3 वेळा माती नांगरल्यानंतर रताळ्याची रोपे लावतात. रताळ्याची रोपे लावल्यानंतर 120 ते 130 दिवसांत रताळे येतात. जेव्हा त्याच्या झाडावरील पाने पिवळी दिसू लागतात तेव्हा त्याचे कंद खोदले जातात. रताळ्याच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांची पेरणी केल्यास उत्पादन चांगले मिळते, असे शेतकरी सुधीर चव्हाण यांनी सांगितले. वर्षा, श्रीनंदिनी, श्रीरत्न, श्री वर्धिनी, क्रॉस-4, कलमेघ, श्रीवरुण, राजेंद्र रताळे-5, श्रीअरुण, श्रीभद्र, कोकण अश्विनी, पुसा पांढरा, पुसा सोनेरी या रताळ्याच्या सुधारित जाती शेतकरी वापरू शकतात, असे त्यांनी सांगितले. रताळ्याच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही. या पिकाची फारशी काळजी घेण्याची गरज नाही. थंडीच्या मोसमात रताळ्याला बाजारपेठेत मागणी जास्त असते. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळतो.
रताळे आरोग्यासाठी फायदेशीर
तुम्हाला माहित असले पाहिजे की सध्या यूपी, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रताळ्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे. रताळे ही बारमाही वेल असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात. याची लागवड कोणत्याही ऋतूत करता येते परंतु उन्हाळा व पावसाळा हे हंगाम चांगले उत्पादनासाठी चांगले असतात. रताळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. रताळ्यामध्ये कॅरोटीनोइड्स देखील आढळतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करतात. बटाट्याच्या तुलनेत रताळ्यामध्ये स्टार्च आणि गोडपणा जास्त प्रमाणात आढळतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी बटाटे निषिद्ध असले तरी रताळे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
महत्वाच्या बातम्या:























