Vicky Kaushal : प्रत्येक सीनसाठी विकी कौशलची जीवतोड मेहनत, एकदा हातही फ्रॅक्चर झाला, अंगावर काटा आणणाऱ्या छावा सिनेमाचं शूटींग कुठं झालंय?
Vicky Kaushal : प्रत्येक सीनसाठी विकी कौशलची जीवतोड मेहनत, एकदा हातही फ्रॅक्चर झाला, अंगावर काटा आणणाऱ्या छावा सिनेमाचं शूटींग कुठं झालंय?

Vicky Kaushal ,मुंबई : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित 'छावा' (Chhaava) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा रुपेरी पडद्यावर साकारलेला जीवनपट प्रेक्षकांना चांगलाच भावतोय. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटात विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ऐतिहासिक कथा आणि दमदार सिनेमॅटोग्राफीमुळे प्रेक्षकांचा या चित्रपटाला भावनिक प्रतिसाद मिळतोय. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असलेल्या या चित्रपटाचं देशभरात अनेक ठिकाणी चित्रीकरण पार पडलं असून मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्येही या चित्रपटाचं चित्रीकरण पार पडलं आहे.
गोरेगाव फिल्मसिटीमध्ये अनेक चित्रपटांचं, वेबसीरिजचं, मालिकांचं , जाहिरातींचं शूटिंग नेहमीच पार पडत असतं. सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या 'छावा' या चित्रपटातील लोकांना भावणाऱ्या थरारक दृष्यांचं चित्रीकरणदेखील मुंबईतील हिरवाईने नटलेल्या गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत पार पडलं आहे.

शूटिंगसाठी गोरेगाव फिल्मसिटी उत्कृष्ट पर्याय
दादासाहेब फाळके चित्रनगरीत आघाडीची कलागारे (स्टुडिओ) आणि चित्रीकरणासाठी अद्ययावत असणाऱ्या सुविधा आहेत. मुंबईच्या निसर्गरम्य परिसरात ही चित्रनगरी वसली आहे. तब्बल 16 कलागारे आणि 70 पेक्षा जास्त बाह्य व नाविन्यपूर्ण चित्रीकरण स्थळांसह डोंगर, तलाव यांसारखी नैसर्गिक स्थळेही चित्रनगरीच्या हद्दीत चित्रीकरणासाठी उपलब्ध आहेत. चित्रनगरीत आजवर भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक 'ब्लॉकबस्टर' आणि 'सुपर-मेगा-ब्लॉकबस्टर' चित्रपटांचे चित्रीकरण झाले असून मराठीसह भारतीय सिनेविश्वाच्या वाढ आणि विकासात चित्रनगरीने अमूल्य योगदान दिले आहे.
छावा सिनेमाच्या शूटींगवेळी विकी कौशलला दुखापत
अभिनेता विकी कौशलला छावा सिनेमाचे शूटींग करत असताना दुखापत झाली होती. 8 फेब्रुवारी 2024 रोजी त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. यावेळी तो छावा सिनेमाचं शूटींग करत होता. छावाच्या प्रत्येक सीनसाठी त्याने जीवतोड मेहनत घेतली होती. जरा हटके जरा बचके' या सिनेमानंतर विकी कौशलने छावा या सिनेमासाठी लक्ष्मण उतेकरसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. दुर्दैवाने याच सेटवर तो जखमी झाला होता.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























