Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'
Ajit Pawar Speech : अजितदादांकडून 'यादगार फर्निचर' दुकानाचं उद्घाटन, म्हणाले; 'उधारीचा धंदा बंद करा'

Ajit Pawar Speech : "उधारीचा धंदा बंद करा, रोखीचा धंदा करा. धंदा जरा कमी झाला तरी चालेलं, बोर्ड लावून ठेवा आज रोख उद्या उधार.." असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलंय. बारामतीमधील (Baramati) यादगार फर्निचर उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.
लगेच श्रीमंत होता येत नाही त्याला कष्ट घ्यावे लागतात : अजित पवार
अजित पवार म्हणाले, संसाराच्या लागणाऱ्या सर्व वस्तू या यादगार फर्निचरमध्ये मिळतात. लगेच श्रीमंत होता येत नाही त्याला कष्ट घ्यावे लागतात. चिकाटी ठेवावी लागते. पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यात या पगार फर्निचर हे नाव नावाजले आहे. अर्ध्या एकराचे हे फर्निचरचे दुकान आहे. बारामती आणि पंचक्रोशी ते नागरिकांना याचा फायदा होईल. पुण्याला किंवा दुसरीकडे जाण्याची गरज नाही.
उधारीचा धंदा करू नका, रोखीचा धंदा करा - अजित पवार
आजकाल नोकरी करता माझ्याकडे आई-वडील पालक मुली वनवन फिरत असतात..मात्र यादगार फर्निचरच्या या धंद्यावर 60-65 लोकांची रोजी रोटी चालत आहे. आज कालच्या तरुणांनी तरुणींनी यातून प्रेरणा घेतली पाहिजे. अलीकडील काळात फर्निचरला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. मला माझ्या आईला भेटायचं आहे, आणखीन पुढे कामे आहेत. लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना नमस्कार करतो. अजिबात उधारीचा धंदा करू नका, रोखीचा धंदा करा. धंदा जरा कमी झाला तरी चालेल बोर्ड लावून ठेवा आज रोख उद्या उधार असं म्हणा.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सार्वजनिक टॉयलेट एवढं चांगले करणार आहे की घरात पण असे टॉयलेट नसेल. 1 कोटी 20 लाख एकाची किंमत आहे. टॉयलेटला जायला पैसे लागणार आहेत..उगाच इकडे तिकडे बघायचं आणि सोडायचं असे चालणार नाही. व्हेटरनरी डॉक्टरचे कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे. राजू दादा इथे आहे पण 300 कोटी लागतात. खासगी संस्थेला पण देता येते पण एवढा खर्च झेपेल का? त्याची चाचपणी मी करतो. मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली तर एक परळी आणि बारामतीत आणणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
