धक्कादायक! धावत्या बसचं चाक निखळलं, 30 प्रवाशांचा जीव टांगणीला; खिळखिळ्या बसवरुन तीव्र संताप
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांपुढे 100 दिवसांचा आढावा ठेवला. त्यानंतर, दरवर्षी राज्य सरकार 5000 नवीन बस खरेदी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

पालघर : एकीकडे 15 टक्के भाडेवाड करत प्रवाशांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी व एसटी (Bus) महामंडळाच्या ताफ्यात नव्या बस येणार असल्याचे सांगत वेळ मारुन नेण्याचं काम राज्य सरकारच्यावतीने केलं जात आहे. नुकतेच सरकारने एसटीच्या प्रवासात 15 टक्के भाडेवाढ केली असून ही प्रवाशांच्या सोयीसाठीच असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, दुसरीकडे राज्यभरातील महामंडळाच्या बसची अवस्था दयनीय झाल्याचं दिसून येत आहे. कुठं बसमध्ये सीटच नाही, कुठं सीट आहे पण गादी नाही, कुठं पत्राच उखडलाय तर कुठं खिडकीच गायब असल्याचे पाहायल मिळत आहे. त्यामुळे सातत्याने प्रवाशांकडून (Passenger) महामंडळाच्या बसेसवरुन संताप व्यक्त केला जात आहे. आता, वसईतील एका बसचा झालेला अपघात (Accident) पाहून पुन्हा तोच संताप व्यक्त होत आहे. कारण, वज्रेश्वरी-वसई मार्गावर एका धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याने 30 प्रवाशांचे प्राण टांगणीला लागल्याचे दिसून आले. सुदैवाने कुठलाही दुर्घटना घडली नाही, पण नागरिकांकडून बसेच्या अवस्थांवरुन नाराजी व्यक्त होत आहे.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांपुढे 100 दिवसांचा आढावा ठेवला. त्यानंतर, दरवर्षी राज्य सरकार 5000 नवीन बस खरेदी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, राज्यातील प्रत्येक बस डेपोतील जुन्या बस पाहून किंवा या बसमधून प्रवास करताना नागरिक व प्रवाशांचा राग अनावर होत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच वसईमध्ये घडलेल्या बस अपघातानेही अशीच संतप्त भावना प्रवाशांकडून व नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वज्रेश्वरी-वसई मार्गावर एका धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याची दुर्घटना घडली. विशेष म्हणजे या बसमधून 30 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने बसचालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली आणि मोठी दुर्घटना टळली. ही घटना रस्त्याच्या बाजुला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हायरल झाला आहे.
जुन्या बस हटवून नव्या बस कधी?
मिळालेल्या माहितीनुसार, ही एसटी बस वज्रेश्वरीहून वसईकडे जात असताना पारोळ गावाजवळ आज दुपारी अचानक पुढील टायर निखळले. टायर सुटल्याने बस डळमळू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणांसाठी बसचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, चालकाने तातडीने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तो मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी अर्ध्या किलोमीटर अंतरावर होता. जर ही घटना महामार्गावर भरधाव वेगाने घडली असती, तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या व धोकादायक बस हटवून नव्या आणि सुरक्षित बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा
Ajit Pawar: ... तर तुमची खैर नाही, अजित पवारांचा बारामतीतून भावकीलाच दम; सुजय पवारांना थेट इशारा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
