एक्स्प्लोर
Advertisement

Diabetes In Children : लहान मुलांमध्ये वाढतेय मधुमेहाचे प्रमाण; पालकांनी काय खबरदारी घ्यायला हवी?
अलीकडच्या काळात या आजाराने लहान मुलांना बळी पडत आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात परंतु जे प्रमुख कारण समोर आले आहे ते म्हणजे वाईट जीवनशैली.
Diabetes In Children
1/10

आजकाल मधुमेहाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात या आजाराचे लहान मुले देखील शिकार होत आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात परंतु जे प्रमुख कारण समोर आले आहे ते म्हणजे वाईट जीवनशैली.
2/10

नुकत्याच प्रकाशित एका अहवालात भारतातील 1,28,500 तरुण मधुमेहाने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे, त्यापैकी 97,700 मुले आहेत, तर डिसेंबर 2022 मध्ये WHO ने सांगितले की 95 टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांना मधुमेहाचा धोका आहे.
3/10

काय आहेत लक्षणं : वारंवार लघवी होणे , थकवा , जास्त तहान लागणे , रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढणे , हात आणि पायांना मुंग्या येणे , मळमळ आणि उलटी , अंधुक दिसणे
4/10

आपल्या मुलाचे मधुमेहापासून संरक्षण कसे करावे हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. योग्य त्यावेळी काळजी घेतली नाही तर हा आजार बळावू शकतो.
5/10

मुलांना सकस आहाराचे महत्त्व शिकवणे, जंक फूड टाळणे, जेवताना मोबाईल पाहू न देणे , जास्त पाणी पिणे, अधिक फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करणे, सावकाश खाणे, पोटभर जेवण घेणे.
6/10

तुमच्या मुलाला दररोज किमान 60 मिनिटे काही शारीरिक हालचाली करण्याकरता प्रोत्साहीत करा. जेणेकरून त्याचे शरीर सक्रिय राहते आणि मुल मधुमेहापासून दूर राहण्यास मदत होईल.
7/10

मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या जेणेकरून ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील आणि इतर लोकांमध्ये मिसळू शकतील.
8/10

घरातील लहान मुलांना आपण तेलकट , तुपकट पदार्थ अनेकदा खायला देतो. मात्र या पदार्थांमुळे मुलांची जाडी वाढू शकते आणि या कारणामुळे मूल मधूमेहाला बळी पडू शकते. त्यामुळे आहार देताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
9/10

लहान मुलांना रोज किमान एक तरी आवळा खायला द्या. आवळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे आणि औषधी गुणधर्म असतात. यात असणारे हायपोग्लायसेमिक गुणधर्मामुळे ब्लड शुगर कंट्रोल होऊ शकते.
10/10

तर कोरफड देखील लहान मुलांना खायला द्यावी. कोरफडीचा रस पिऊन तुम्ही मधुमेह नियंत्रित करू शकता. कोरफडीचा ज्युस पिणे फार गरजेचे आहे.
Published at : 23 Sep 2023 11:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
