ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-
ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 07 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा...५ फेब्रुवारीला मतदान आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी...
महाराष्ट्रात ईव्हीएमवरचे विरोधकांचे सर्व आक्षेप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळले...ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचं स्पष्टीकरण...
राजीनामा दिलेला नाही, मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची चर्चा फेटाळली, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला सहभाग...
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार, संभाजीराजे छत्रपतींची आक्रमक भूमिका...तर नैतिकतेला धरून राजीनामा द्यायला हवा, सुप्रिया सुळेंची मागणी...
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास ही धूळफेक, संजय राऊतांचा आरोप...खटला बीडबाहेर चालवण्याची आणि बीडमधलं पोलीस खातं बरखास्त करण्याची केली मागणी...
सरपंच हत्याप्रकरणी हायकोर्टातील याचिका प्रलंबित ठेवण्याची देशमुखांच्या भावाची विनंती, तपास यंत्रणेला वेळ देण्यासाठी तूर्तास सुनावणी नको, धनंजय देशमुखांचा आग्रह