एक्स्प्लोर
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी शिर्डी साई दरबारी गर्दी केली होती. राज्यातील अनेक तीर्थस्थळी दर्शन घेऊन भाविकांनी नववर्षाची सुरुवात केली
Shirdi saibaba devotee donation of gold and cash
1/7

नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी शिर्डी साई दरबारी गर्दी केली होती. राज्यातील अनेक तीर्थस्थळी दर्शन घेऊन भाविकांनी नववर्षाची सुरुवात केली, यावेळी मंदिरात भरभरुन दानही दिलं
2/7

नाताळच्या सुट्ट्या व नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यान भाविकांकडून साईंच्याचरणी कोटींचे दान अर्पण करण्यात आलं आहे. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान 9 दिवसात भाविकांकडून एकूण 16 कोटी 61 लाख 80 हजार रकमेचे दान करण्यात आलं आहे.
3/7

शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली. नाताळाच्या सुट्ट्या नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान 8 लाखांहून अधिक भाविक साईचरणी नतमस्तक झाले आहेत.
4/7

देणगी काऊंटर वरुन 03 कोटी 22 लाख 27 हजार 508 रुपये प्राप्त, तर पीआरओ सशुल्क देणगी पासेसचे 01 कोटी 96 लाख 44 हजार 200 रुपये
5/7

दक्षिणा पेटीतून 06 कोटी 12 लाख 91हजार 875 रुपयांचे दान साईचरणी अर्पण झालं आहे
6/7

डेबीट क्रेडीट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी.देणगी , मनी ऑर्डर - 04 कोटी 65 लाख 73 हजार 698
7/7

सोने 809.220 ग्रॅम - 54 लाख 49 हजार 686 रुपये, तर चांदी - 14398.300 ग्रॅम - 09 लाख, 93 हजार 815 रुपये
Published at : 03 Jan 2025 07:11 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















