एक्स्प्लोर
Spinach Side Effects: या 5 लोकांसाठी पालक ठरू शकतो 'विष', खाण्याची चूक करू नका; अन्यथा गंभीर नुकसान होईल!
पालकामध्ये असलेले लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण, काही लोकांसाठी पालक खाल्ल्याने गंभीर नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का?

पालक
1/9

पालक हे सर्वसाधारणपणे सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले लोह, कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
2/9

पण, काही लोकांसाठी पालक खाल्ल्याने गंभीर नुकसान होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का?
3/9

चला जाणून घेऊया त्या 5 कॅटेगरीच्या लोकांबद्दल ज्यांनी पालक टाळावे.
4/9

पालकमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, जे कॅल्शियमसोबत किडनी स्टोन बनण्याची शक्यता वाढवते. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी पालक खाणे टाळावे, कारण त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते.
5/9

ज्यांना यूरिक ऍसिडची समस्या आहे त्यांच्यासाठी पालक हानिकारक ठरू शकतो. पालकामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी वाढते आणि गाउट सारख्या समस्या उद्भवू शकतात.
6/9

पालक हा लोहाचा उत्तम स्रोत आहे. मात्र, ज्यांच्या शरीरात आधीच लोहाचे प्रमाण जास्त आहे अशा लोकांनी पालक खाणे टाळावे. आयर्न ओव्हरलोडमुळे यकृत आणि हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
7/9

पालकमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते, जे रक्त गोठण्यास मदत करते. परंतु जर एखादी व्यक्ती रक्त पातळ करणारे औषध घेत असेल तर पालकाच्या सेवनाने औषधाचा प्रभाव कमी होतो आणि आरोग्यास हानी पोहोचते.
8/9

पालकामध्ये काही घटक असतात जे पोटात गॅस, ॲसिडिटी आणि फुगणे यासारख्या समस्या वाढवू शकतात. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी पालकाचे सेवन कमी प्रमाणात करावे किंवा अजिबात करू नये.
9/9

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
Published at : 03 Jan 2025 01:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
