महाराष्ट्र-गुजरातमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेस एक महिन्यासाठी रद्द
मुंबई - अहमदाबाद धावणारी तेजस एक्सप्रेस 2 एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे.

मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा वेग थांबायचं नाव घेताना दिसत नाही. गेल्या 24 तासात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सर्वाधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद ते मुंबई धावणारी तेजस एक्सप्रेस एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे. आईआरसीटीसीतर्फे चालवण्यात येणारी 82902/82901 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल- अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आजपासून (2 एप्रिल) एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे.
राज्यात काल तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद
राज्यात काल तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल 32 हजार 641 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 24,33,368 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.2% एवढा झाला आहे. राज्यात आज 249 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.92% एवढा आहे.
Temporary suspension of ADI-BCT-ADI Tejas Express due to recent COVID-19 rising cases, says IRCTC pic.twitter.com/0QITlyqrBJ
— ANI (@ANI) April 1, 2021
गुजरातमध्ये 2410 कोरोनाबाधितांची नोंद
महाराष्ट्राच्याजवळ असणाऱ्या गुजरात राज्यात काल सर्वाधिक 2410 कोरोनाबाधितांची नोंद झाली. गुजरात राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 10 हजार 108 वर गेला आहे. अहमदाबादमध्ये काल 626 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
