एक्स्प्लोर

Fact Check : टीम इंडियाच्या खेळाडूंचा डान्स करतानाचा जुना व्हिडिओ नवा म्हणून व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 

Fact Check : विश्वास न्यूजच्या पडताळणीत व्हायरल होत असलेला भारतीय क्रिकेटपटूंच्या व्हिडिओ 2024 मधील असल्याचं समोर आलं आहे. जेव्हा भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. 

विश्वास न्यूज (नवी दिल्ली) : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतानं पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे. भारतानं रविवारी (23 फेब्रुवारी ) ला झालेल्या सामन्यात पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली सह इतर खेळाडू डान्स करताना पाहायला मिळत आहेत. काही यूजर्स व्हिडीओ शेअर करत सध्याचा व्हिडीओ असल्याचं सांगत आहेत. दावा केला जातोय की चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर सर्व खेळाडूंनी जल्लोष केलाय.

विश्वास न्यूजनं दाव्याची पडताळणी केली असता तो व्हिडिओ 2024 मध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमधील आहे. त्यावेळी भारतीय संघानं टी  20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर जल्लोष केला होता. तिथं भारतीय खेळाडूंनी डान्स केलेला. त्याचा व्हिडिओ आताचा सांगून शेअर केला जात आहे.  

फेसबुक यूजर 'Pratosh K Karn' यानं 23 फेब्रुवारी 2025 ला व्हायरल व्हिडिओ सेअर करत ऐतिहासिक विजय असं म्हटलं. 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप लीगमध्ये भारतीय क्रिकेट संघानं दमदार कामगिरी करत पाकिस्तानला पराभूत केलं. टीम इंडियाच्या या गौरवशाली कामगिरीनंतर सर्व खेळाडूंनी एकत्र होत डान्स केला, हा फक्त एक विजय नाही तर भारताच्या क्रिकेटच्या श्रेष्ठतचं उदाहरण आहे. विराट तर विराट आहे, जय हिंद जय भारत...

पोस्टची अर्काईव्हची लिंक इथ पाहा...

Fact Check : टीम इंडियाच्या खेळाडूंचा डान्स करतानाचा जुना व्हिडिओ नवा म्हणून व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 

सोशल मीडियावर काही यूजर्सनं हा व्हिडिओ त्याच दाव्यासह शेअर केला आहे.

पडताळणी

व्हायरल पोस्टची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या की फ्रेम काढून गुगल लेन्सच्या मदतीनं सर्च केल्या. आम्हाला बीसीसीआयच्या अधिकृत एक्स हँडलवरील व्हिडिओ मिळाला. व्हिडिओ 5 जुलै 2024 चा आहे. या माहितीनुसार व्हिडिओ वानखेडे स्टेडियमवरील टी 20 वर्ल्ड कपनंतरचा आहे. 

शोध सुरु असताना आम्हाला व्हिडिओशी संबंधित एएनआयच्या वेबसाईटवर बातमी मिळाली. रिपोर्ट 5 जुलै  2024 ला प्रकाशित करण्यात आला आहे. बातमीनुसार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीमनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्याचा जल्लोष वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. तिथं खेळाडूंनी डान्स केला. 

Fact Check : टीम इंडियाच्या खेळाडूंचा डान्स करतानाचा जुना व्हिडिओ नवा म्हणून व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 

व्हायरल व्हिडिओशी संबंधित अन्य बातम्या इथं वाचू शकता. ज्या 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

अधिक माहितीसाठी आम्ही दैनिक जागरणचे स्पोर्ट्स एडिटर अभिषेक त्रिपाठी यांच्याशी संपर्क केला. त्यांनी हा व्हायरल व्हिडिओ टी 20 वर्ल्ड कपचा असल्याचं सांगितलं. 

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतानं दोन विजय मिळवले आहेत. 23 फेब्रुवारी 2025 ला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारतानं 6 विकेटनं विजय मिळवला होता. भारतीय संघाला 242 धावांचं आव्हान मिळालं होतं. ते 42.3 ओव्हरमध्ये पूर्ण करत भारतानं विजय मिळवला. 

Fact Check : टीम इंडियाच्या खेळाडूंचा डान्स करतानाचा जुना व्हिडिओ नवा म्हणून व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 

शेवटी आम्ही हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या यूजर्सच्या अकाऊंटची पडताळणी केली. या व्यक्तीला चार हजार लोक फॉलोअर्स करतात. यूजर्नं तो दरभंगा येथील असल्याचं सांगितलं आहे. 

निष्कर्ष :  विश्वास न्यूजच्या पडताळणीत हे सत्य समोर आलं की भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ अलीकडील नाही. तो 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतरचा आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जल्लोष करण्यात आला होता. तो व्हिडिओ लोक आताचा सांगून शेअर करत आहेत. व्हिडिओ सध्याचा नसून चॅम्पियन्स ट्रॉफीचा संबंध नाही हे स्पष्ट झालं आहे. 

Claim Review : चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला हरवून टीम इंडियाचा डान्स 
Claimed By : FB User- Pratosh K Khan  
Fact Check : भ्रामक  

[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget