एक्स्प्लोर
प्राजक्ता कोळी लग्नबंधनात अडकली, बॉयफ्रेंडसोबत केलं धुमधडाक्यात लग्न; पाहा खास फोटो!
Prajakta Koli Marriage : प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची चर्चा होती.

prajakta koli marriage photo
1/8

प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चा होती. आज ती लग्नबंधनात अडकली आहे.
2/8

अगदी शाही थाटात प्राजक्ताचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी तिचे तसेच तिचा पती वृषांक खनाल यांचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते.
3/8

लग्नाआधी त्यांच्या विवाहाच्या वेगवेगळ्या विधी पार पडल्या. यात हळदी समारंभ, मेहंदी समारंभ यांचा समावेश होता.
4/8

या सर्व समारंभांचे फोटो प्राजक्ता कोळीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केल्या होत्या. विशेष म्हणजे या सर्वच समारंभांत प्राजक्ता फारच खूश दिसत होती. दरम्यान, 25 फेब्रुवारी 2025 रोजी तिचे लग्न पार पडले आहे. तिच्या लग्नाच्या सोहळ्यात तिने खूपच आकर्षक असा लेहंगा परिधान केला होता.
5/8

लग्नसोहळ्यात तिने साधा-सुधा मेकअप केला होता. त्यामुळेच तिचे सौंदर्य अधिक खुलले होते. प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल हे गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी आपलं नातं सार्वजनिक केलं होतं. त्यांनी यापूर्वी एकमेकांसोबतचे फोटो आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केलेले आहेत.
6/8

लग्नात प्राजक्ताने अनिता डोंगरेने डिझाईन केलेला लेंहगा परिधान केला होता. पारिजात पॅटर्न तसेच पिचवाई पेंटिंग असलेला सेज आणि गोल्डन रंगाच्या लेहंग्यात प्राजक्ता फारच सुंदर दिसत होती.
7/8

या लेहंग्यासोबत तिने गोल्डन रंगाची ज्वेलरी घातली होती. तिच्या गळ्यात हेवी नेकलेस दिसत होता. हातात बांगड्या, केसांत बिंदी असा तिचा आकर्षक लुक होता.
8/8

दुसरीकडे अनिता डोंगरेनेच डिझाईन केलेली शेरवानी वृषांक खनालने परिधान केली होती. डोक्यावर फेटा आणि डोळ्यांना काळा गॉगल परिधान करून वृषांकने लग्नमंडपात प्रवेश केला. आता दोघेही एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकले आहेत.
Published at : 25 Feb 2025 10:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
