एक्स्प्लोर

दलाल मंत्रालयात नकोत! माणिकराव कोकाटेंसह सात मंत्र्यांच्या OSD आणि खासगी सचिवांची नेमणूक

Minister OSD And PS List : दलाली करणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती ओएसडी आणि खासगी सचिव म्हणून करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 

मुंबई : फिक्सर ओएसडी आणि खासगी सचिवांना मंत्रालयाच्या बाहेर ठेवणार असा शब्द दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता सात मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. यापैकी पाच मंत्र्यांचे ओएसडी आणि दोन मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. अद्यापही अनेक मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नियुक्ती बाकी आहे. मंत्र्यांनी दिलेल्या नावाची छाननी होऊनच मग नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. 

मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंत्री जयकुमार रावल आणि इंद्रनील नाईक यांच्या खासगी सचिवांची नियुक्तीचे सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. 

मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमणुकीवरून राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा झाली होती. कुणी काहीही नावं दिली तरी फिक्सर आणि डागाळलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.  त्यानंतर आता सात मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएसचे आदेश देण्यात आले आहेत.  

Minister OSD And PS List : ओएसडीची यादी 

- डॉ भवानजी आगे पाटील - विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री गणेश नाईक)

- अनिल गागणे - विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री मंगलप्रभात लोढा)

- प्रशांत पाटील - विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री जयकुमार रावळ)

- राजेश मोरे - विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री आशिष शेलार)

- डॉ. सुबोध नंदागवळी - विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री माणिकराव कोकाटे)

- मंगेश पिसाळ - विशेष कार्यकारी अधिकारी (मंत्री बाबासाहेब पाटील)

- प्रशांत खेडेकर - खासगी सचिव ( मंत्री इंद्रनील नाईक). 

दलालांना मंत्रालयात नेमणार नाही

राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला हवे असलेले ओएसडी आणि पीएस मिळत नसल्याचं सांगितलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. यासंदर्भातील प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात, आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात. हे नव्याने होत नाही. कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदर सांगितलं होतं. तुम्हाला पाहिजे ते नाव पाठवा, मात्र ज्यांचे नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना मी मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाला तरी त्याला मान्यता देणार नाही."

ही बातमी वाचा: 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, प्रतिज्ञापत्रातील माहिती
Maharashtra Live blog updates: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, प्रतिज्ञापत्रातील माहिती
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
NCP Merger : होय, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता; एबीपी माझाच्या बातमीला राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दुजोरा
होय, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता; 'एबीपी माझा'च्या बातमीला राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दुजोरा

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Petrol Diesel gas shortage: पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Embed widget