एक्स्प्लोर

Malvan News: अस्तनीतले निखारे! इंडिया पाकिस्तान मॅचनंतर मालवणमध्ये भारत विरोधी घोषणा देणाऱ्या तिघांना अटक; भंगार व्यावसायिकाची झोपडी उद्ध्वस्त

Malvan News: एक जण अल्पवयीन असल्याने त्या कायद्यानुसार कार्यवाही सुरु आहे. तर परप्रांतीय भंगार व्यवसायिकाच्या बेकादेशीर झोपडी जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. प्रशासनाने ही अनधिकृत झोपडी उद्ध्वस्त केली आहे.

मालवण: भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये भारत विजयी झाल्यानंतर मालवणमधील काही मुस्लिम समाजाच्या तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन भडकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मालवणातील सर्व हिंदू युवकांनी रात्री या देशद्रोहीना पोलिसांच्या स्वाधीन केले. दुपारी मालवण देऊळवाडा पुलावरून मोटरसायकल रॅलीने मालवण पोलीस स्टेशन येथे हिंदू समाजाच्या वतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. परप्रांतीय भंगार व्यवसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला होता. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी संबंधितांना विचारणा केली असता त्या संबंधितांकडून अरेरावी करण्यात आली. यानंतर संतप्त नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी एका कुटुंबातील तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती एकाला अटक करण्यात आली आहे. एक जण अल्पवयीन असल्याने त्या कायद्यानुसार कार्यवाही सुरु आहे. तर परप्रांतीय भंगार व्यवसायिकाच्या बेकादेशीर झोपडी जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. प्रशासनाने ही अनधिकृत झोपडी उद्ध्वस्त केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मालवणमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर या घोषणा देण्यात आल्या होत्या. अटक केलेली व्यक्ती ही परप्रांतीय भंगार व्यावसायिक असल्याची माहिती आहे. त्यांनी देशाविरोधात घोषणा दिल्यानंतर नागरिकांनी त्याला जाब विचारल्यानंतर तो अरेरावी करत होता. त्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांची ताब्यात घेऊन चौकशी केली, ताब्यातील एक जण अल्पवयीन असल्यामुळे त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या भंगार व्यवसायिकाची बेकायदा झोपडपट्टी उध्वस्त करण्यात आली आहे. 

भारत पाकिस्तान मॅच संपली. भारत जिंकल्यानंतर भारत विरोधी घोषणा या व्यक्तीने देण्यास सुरुवात केली. ते परप्रांतीय म्हणून या ठिकाणी आले होते. त्यांनी भंगाराचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी परिसरामध्ये आपलं दुकान उभारलं होतं. तिथेच त्यांनी झोपडी बांधली होती, तिथेच ते राहत होते. सामना संपल्यानंतर त्याने देशाविरोधात घोषणा दिल्या, त्या नंतर स्थानिकांनी त्याला प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी अरेरावी केली. स्थानिकांनी या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. यांची चौकशी केली. चौकशीअंती एकाला अटक करण्यात आली. मात्र, काल रात्री उशिरा दुसऱ्या दोघांना अटक केली. स्थानिकांनी याबाबत रॅली काढली यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी पोलिसांना निवेदन दिलं. स्थानिक आमदार निलेश राणे यांनी देखील या घटनेची दखल घेत, शासनाला पोलिसांना या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस प्रशासनाने त्यानंतर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता, मालवण नगरपालिकेने त्या व्यक्तीचे अनधिकृत रित्या बांधलेली झोपडी जमीनदोस्त केली आहे. 

अशा लोकांना राजकीय आश्रय - विनायक राऊत 

याप्रकरणी ठाकरे गटाते नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मालवणमध्ये राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारी कीड चिरडून टाकावी लागेल. परंतु ही कीड कोणाच्या आशीर्वादाने तिथे आली, उभी राहिली त्यांचा सुद्धा शोध घेण्याची गरज आहे. मागच्या तीन वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री त्या ठिकाणी होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही गोष्ट नजरेस आली नाही का, किंबहुना मालवण सारख्या शहरांमध्ये पाकिस्तानी नागरिक राहतो. याची पुसटशीही कल्पना पोलीस यंत्रणेलाही मिळू नये, यामुळे पोलीस आणि यंत्रणा काय करते हे दिसून येते. त्यामुळे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे मालवणमध्येच काय तर या देशातून निस्तनाबूत करणे हे आपल्या प्रथम कर्तव्य ठरेल. अशा लोकांना राजकीय आश्रय असल्याशिवाय तिथे तो भंगारचा व्यवसाय चालू शकत नव्हता, त्यामुळे त्याला राजकीय श्रेय देणारा कोण होता हे नाव सुद्धा उघड करण्याची गरज आहे, असंही पुढे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 11 March 2025 : 6 PMABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 11 March 2025Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 :  ABP Majha : 5 PmPrakash Solanke Statement | मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो; सोळंकेंचं वक्तव्य, अडचणी वाढणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
बीडनंतर आता लातूर; 5 जणांकडून एकास भररस्त्यात बेदम मारहाण, प्रकृती गंभीर; व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
Embed widget