एक्स्प्लोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात जनतेतील कार्यक्रमाला येत आहेत. खुंटेफळ धरणाच्या बोगद्याच्या प्रकल्पाच्या  कामाच्या शुभारंभासाठी ते येणार आहेत.

अहिल्यानगर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण व खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे सध्या बीड (Beed) जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच, महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडेंविरुद्ध आरोपींचे गौप्यस्फोट करत राजकीय धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर जात आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते बीड दौऱ्यावर असून आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी त्यांच्या कार्यक्रमाबाबतची माहिती दिली. तसेच, या बैठकीला बीड जिल्ह्यातील दोन्ही मंत्री उपस्थित राहणार का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं, तर मुंडे बंधु-भगिनींबाबत मोठं वक्तव्य केलं.  

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात जनतेतील कार्यक्रमाला येत आहेत. खुंटेफळ धरणाच्या बोगद्याच्या प्रकल्पाच्या  कामाच्या शुभारंभासाठी ते येणार असून 1.68 टीएमसी पाणी येथील शेतकऱ्यांना मिळणार आहे. सन 2005-06 पासून ही योजना माझ्या डोक्यात होती. या प्रकल्पामुळे आष्टी तालुक्यातील जवळपास 27 हजार 500 हेक्टर  जमीन ओलिताखाली येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्ह्यात जोरदार स्वागत करणार असून 65 हजार लोक या कार्यक्रमाला येणार आहेत, अशी माहिती आमदार धस यांनी दिली. मात्र, जिल्ह्यातील दोन मंत्री मुंडे बंधु-भगिनींबाबतच्या वक्तव्यावर त्यांनी मोठं वक्तव्य केलं. जिल्ह्यातील मंत्री आणण्याची आमची क्षमता नाही, पण जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्‍यांची नावं पत्रिकेवर आहेत, असे सुरेश धस यांनी म्हटलं. या कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथाच्या समाधीवर मुख्यमंत्री दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी, 10 कोटी रुपयांच्या गाभाऱ्याचा शुभारंभ करणार आहेत, असेही धस यांनी म्हटले. 

परळी नगरपरिषदेतही मोठा घोटाळा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे करुन करुन काय करेल. धनंजय देशमुख यांनी जी सूचना केली त्याबाबत पोलिसांनी दखल घ्यावी. महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना देखील लवकरात लवकर अटक झाले पाहिजे. जिल्हा नियोजनच्या 73 कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे हे अद्याप अजित पवारांना दिलेली नाहीत.  कोरोना काळात "यांनी" (मुंडे) जी लफडी केली, त्याची कागदपत्रे बाहेर काढणार आहे. परळी नगरपरिषदेत देखील मोठा घोटाळा असून तोही बाहेर काढणार असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं

हेही वाचा

कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Muzumdar Majha Maha Katta : तेव्हा महिला टीमवर मी आवाज वाढवला.. मुझुमदार यांनी सांगितला प्रसंग
Amol Muzumdar Majha Maha Katta World Cup
Local Body Election आरक्षण मर्यादेबाबत कोर्टात सुनावणी,आरक्षण मर्यादा ओलांडली गेल्याची आयोगाची कबुली
Special Report Raj Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Repo Rate : आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
आरबीआयकडून डिसेंबरमध्ये रेपो रेट कपातीची शक्यता, रेपो रेट 5.25 टक्क्यांवर येणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Hingoli : शिंदे गटात जाण्यासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
सत्तांतरणासाठी संतोष बांगरांनी 50 खोके घेत 'ओक्के' केलं, भाजप आमदाराचा दावा, हिंगोलीत वाद पेटला
Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या
Kajol Twinkle Khanna Two Much Show Controversy: फिजिकल चीटिंग, लग्नाच्या कमेंटमुळे फसल्या काजोल-ट्विंकल; म्हणाल्या, 'आमची कोणतीही वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका...'
फिजिकल चीटिंग, लग्नाच्या कमेंटमुळे फसल्या काजोल-ट्विंकल; म्हणाल्या, 'आमची कोणतीही वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका...'
Multibagger Stock :  2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
Embed widget