Mahashivratri 2025: यंदाची महाशिवरात्री खास! तुमच्या राशीनुसार करा भगवान शंकराची पूजा, दु:ख, अडचणी होतील दूर; पूजा, मंत्र, जप, जाणून घ्या ..
Mahashivratri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची महाशिवरात्री खास आहे, तुमच्या राशीनुसार भगवान शंकराची पूजा केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळतील..

Mahashivratri 2025: शिव सत्य आहे.. शिव सुंदर आहे... शिव अनंत आहे.. शिव ब्रम्ह आहे...शिव भक्ती आहे.. हिंदू धर्मात भगवान शंकराला आदिदेव म्हटले जाते. शिव, भोलेनाथ, आदिनाथ, महेश अशी अनेक नावे भगवान शंकराची आहेत. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकर हे अत्यंत भोळे असून आपल्या भक्ताला ते वरदान देतात. अशा या भगवान शिवाचा सण म्हणजेच महाशिवरात्री.. या निमित्त देशभरात तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. या दिवसाची शिवभक्त आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक उपवास करतात. तसेच, ते भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा विधीपूर्वक करतात.
महाशिवरात्री पूजेची वेळ
ज्योतिषींच्या मते शिवरात्रीच्या निशिता काळात पूजेची वेळ 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:23 ते 1:12 पर्यंत असेल. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:55 ते 8:54 पर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे.
शिवरात्रीला पूजा करण्याची पद्धत
सकाळची तयारी : सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून व्रताचा संकल्प करा.
शिवलिंगाचा अभिषेक : शिवलिंगाला गंगाजल, दूध, दही, तूप, मध आणि साखरेने स्नान घालावे.
पूजा साहित्य अर्पण करणे : भगवान शंकराला बेलपत्र, धतुरा, भांग, मनुका, पांढरी फुले इत्यादी अर्पण करा.
मंत्राचा जप : “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करा आणि भगवान शिवाचे ध्यान करा.
आरती आणि प्रसाद : भगवान शंकराची आरती करा आणि प्रसाद वाटप करा.
महाशिवरात्रीला राशीनुसार शिवाची पूजा करा
मेष - मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराला बेलपत्र आणि लाल फुले अर्पण करावीत.
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दही आणि दुधाचा अभिषेक करावा.
मिथुन -मिथुन राशीच्या लोकांनी शिवलिंगाला बेलची पाने आणि लाल फुले अर्पण करावीत.
कर्क - कर्क राशीच्या लोकांनी भगवान शंकराला दूध अर्पण करावे.
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी भगवान शंकराला मध आणि गूळ अर्पण करावा.
कन्या - कन्या राशीच्या लोकांनी भगवान शिवाला बेलपत्र आणि मधाचा अभिषेक करावा.
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी भगवान शिवाला दूध, दही, तूप आणि मधाचा अभिषेक करावा.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान शिवाला मधाचा अभिषेक करावा आणि लाल फुले अर्पण करावीत.
धनु - धनु राशीच्या भगवान शिवाला पिवळी फुले अर्पण करा आणि दूध आणि हळदीचा अभिषेक करा.
मकर - मकर राशीच्या लोकांनी भगवान शंकराला बेलपत्र, दही, गंगाजल आणि गाईचे दूध इत्यादी अर्पण करावे.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी शंकरासोबत शनिदेवाची पूजा करावी.
मीन - मीन राशीच्या लोकांनी पंचामृताने अभिषेक करावा आणि भगवान शंकराला पिवळे फुल अर्पण करावे.
हेही वाचा>>>
Maha Shivratri Wishes 2025 In Marathi: शिव सत्य आहे.. शिव अनंत आहे..! महाशिवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा सर्वोत्तम भक्तिमय शुभेच्छा संदेश!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















