Champions Trophy 2025 Team India Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणासोबत होणार?; पाहा A टू Z माहिती
Champions Trophy 2025 Team India Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह अ गटात आहे.

Champions Trophy 2025 Team India Semi Final: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये (Champions Trophy 2025 Team India Semi Final) प्रवेश केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध खेळेल हे जाणून घेण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे. भारताचा उपांत्य सामना कधी, कुठे आणि कोणत्या वेळी खेळला जाईल, याबाबत जाणून घ्या...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह अ गटात आहे. भारताने बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना 6 विकेट्सने जिंकला. यानंतर पाकिस्तानचाही 6 विकेट्सने पराभव झाला. भारताला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. मात्र या सामन्याआधीच भारत आणि न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
The first two semi-finalists of #ChampionsTrophy 2025 🏆
— ICC (@ICC) February 24, 2025
Details: https://t.co/EVdyKNzUp2 pic.twitter.com/F9zyoGhOXL
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना कधी खेळला जाईल?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना कधी खेळला जाईल?
चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना 5 मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होईल. नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता होईल आणि सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा उपांत्य सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व सामने फक्त दुबईमध्ये खेळेल. भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा उपांत्य सामना 4 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत कोणत्या संघासोबत उपांत्य फेरीचा सामना खेळेल?
न्यूझीलंड संघ हा भारतासह गट ए मधून उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ आहे. आता भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्यात जर भारत जिंकला तर ते पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असेल आणि न्यूझीलंडच्या बाबतीतही तेच आहे. जर भारत अव्वल स्थानावर राहिला तर त्याचा सामना ग्रुप बी मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. जर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावला तर ते ग्रुप बी मधील अव्वल संघाविरुद्ध खेळेल. ग्रुप बी मधील कोणत्याही संघाचे सेमीफायनलचे तिकीट निश्चित झालेले नाही. सर्व संघांनी 1-1 सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया 1-1 विजयांसह अनुक्रमे 1 आणि 2 क्रमांकावर आहेत. इंग्लंड आणि अफगाणिस्तान अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.





















