एक्स्प्लोर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणचा आठवा हप्ता आजपासून जमा होणार, 'त्या' लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणं थांबणार, कारण...
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यात आजपासून पाठवली जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
1/5

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. या योजनेतून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवले जातात.
2/5

महाराष्ट्रातील महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वाटा महत्त्वाचा ठरला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या आर्थिक स्थितीबाबत पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळं डिसेंबर जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीत महिलांची संख्या कमी होणार आहे.
Published at : 25 Feb 2025 01:01 PM (IST)
आणखी पाहा
























