गौतम अदानींची मोठी घोषणा, तब्बल 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, रोजगाराच्या मोठ्या संधी
Gautam Adani : अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मोठी घोषण केली आहे. ते आसाम राज्यात 50000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.

Gautam Adani : अदानी उद्योग समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मोठी घोषण केली आहे. ते आसाम राज्यात 50000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. गुवाहाटी, आसाम येथे आयोजित 'ॲडव्हांटेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा समिट 2025 मध्ये ही घोषणा केली आहे. ही केवळ गुंतवणूक नाही, तर आसामच्या सुवर्ण भविष्याचा पाया घालण्याचा निर्धार आहे. आम्ही या विकासाच्या प्रवासाचा एक भाग आहोत असे गौतम अदानी म्हणाले.
दरम्यान, 50,000 कोटी रुपयांच्या या मेगा गुंतवणुकीमुळे आसाममधील विमानतळ, एरो सिटी, सिटी गॅस वितरण, पारेषण, सिमेंट आणि रस्ते प्रकल्पांना चालना मिळणार असल्याची माहिती गौतम अदानी यांनी दिली. ही केवळ घोषणा नसून आसामच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचा मास्टर प्लॅन असल्याचे अदानी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुंतवणूक धोरणाचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुंतवणूक धोरणाचे कौतुक करताना गौतम अदानी म्हणाले,की 2003 मध्ये गुजरातमध्ये सुरू झालेल्या व्हायब्रंट गुजरात समिटने संपूर्ण देशाला गुंतवणूक आधारित विकासाची ताकद दाखवली. आज आसामही त्याच मार्गावर वाटचाल करत आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मपुत्रा नदी स्वतःचा मार्ग बनवते, त्याच प्रकारे पंतप्रधान मोदींनी भारतामध्ये देशाच्या विकासाचा नवा मार्ग खुला केला आहे असं अदानी म्हणाले.
आसामच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि सांस्कृतिक वारशाचाही उल्लेख
गौतम अदानी यांनी आसामच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि सांस्कृतिक वारशाचाही उल्लेख केला. जेव्हाही मी कामाख्या मातेच्या या पवित्र भूमीवर पाऊल ठेवतो तेव्हा तिथलं सौंदर्य आणि भव्यता मला आनंदित करते असे अदानी म्हणाले.
तरुणांसाठी सुवर्णसंधी
अदानी समूहाच्या या गुंतवणुकीमुळे आसाममध्ये हजारो नवीन रोजगार निर्माण होतील तसेच पायाभूत सुविधा मजबूत होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजेच आता आसाममधील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही. तर मोठ्या कंपन्या स्वत:हून त्यांच्या दारात येतील. या मोठ्या घोषणेनंतर आता अदानी समूहाचे हे प्रकल्प आसामचा चेहरामोहरा किती लवकर बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्य प्रदेशताही अदानी समूह करणार मोठी गुंतवणूक
मध्य प्रदेशत राज्यात अदानी समूहाच्या या मोठ्या गुंतवणुकीतून 1 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. मध्य प्रदेशातील ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2025 च्या व्यासपीठावरून अदानी समूहाने राज्यात 2.10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक विविध क्षेत्रांमध्ये केली जाईल, ज्यामध्ये पंप केलेले स्टोरेज, सिमेंट, खाणकाम, स्मार्ट मीटर आणि थर्मल एनर्जी क्षेत्रांचा समावेश आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, 1 लाख कोटी रुपयांच्या या गुंतवणुकीअंतर्गत ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी प्रकल्प आणि विमानतळ प्रकल्पाबाबत राज्य सरकारशी बोलणी सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या:
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
