एक्स्प्लोर
Champions Trophy 2025 : भारताविरुद्ध पराभव, चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी, पाकिस्तानच्या महत्त्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी करणार?
Champions Trophy 2025 : न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफीतील आव्हानं संपुष्टात आलं आहे.

पाकिस्तान भाकरी फिरवणार
1/6

पाकिस्ताननं यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं असून सलग दोन पराभवामुळं त्यांचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. न्यूझीलंड आणि भारताविरूद्धच्या पराभवानं त्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला. स्पर्धा सुरु होताच पहिल्या पाच दिवसात पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेलं आहे.
2/6

पाकिस्तानच्या या निराशाजनक कामगिरीमुळं पीसीबीमध्ये मोठ्या घडामोडी सुरु आहेत. या दरम्यान पीसीबी पाकच्या टीमचे प्रशिक्षक आकिब जावेद यांची हकालपट्टी करण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे.
3/6

न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानवर टीका होत आहे. पाकचे माजी माजी क्रिकेटपटू खेळाडूंसह , कोचिंग स्टाफ, निवड समितीच्या सदस्यांना दोषी मानत आहेत.
4/6

गॅरी कर्स्टनला पदावरुन हटवल्यानंतर पीसीबीनं गेल्या वर्षी आकिब जावेद यांना मुख्य प्रशिक्षक केलं होतं. पीटीआयनं पीसीबीच्या सूत्रांच्या हवाल्यानं बातमी दिली आहे. सपोर्ट स्टाफ देखील बदलला जाणार आहे. याशिवाय पीसीबी वेगवेगळ्या प्रशिक्षकांच्या पर्यायावर विचार करत आहे.
5/6

पाकिस्तान क्रिकेटसाठी गेली काही वर्ष आव्हानात्मक राहिली आहेत. टीमचे मुख्य प्रशिक्षक, निवड समिती बदलली गेली आहे. आता मुख्य प्रशिक्षक म्हणून कुणाला संधी द्यायची, असा नवा प्रश्न पीसीबीपुढं आहे.
6/6

चॅम्पियन्स ट्रॉफीत अ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांग्लादेश हे चार संघ होते. यापैकी भारत आणि न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. तर, पाकिस्तान, बांग्लादेश स्पर्धेबाहेर गेले आहेत.
Published at : 25 Feb 2025 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
