एक्स्प्लोर

दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द, आता सेमीफायनलचं समीकरण बदललं; जाणून घ्या नेमकं कसं?

South Africa vs Australia Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

South Africa vs Australia Champions Trophy Match: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सातवा सामना रद्दा झाला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार होता. मात्र रावळपिंडी येथील जोराच्या पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला आहे. विशेष म्हणजे रावळपिंडी येथील हवामान एवढे खराब होते की या सामन्यासाठी नाणेफेकही होऊ शकली नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना द्द झाल्यानंतर ग्रुब-बी मधील समीकरण चांगलेच बदलले आहे. हा सामना रद्द झाल्यानंतर आता पुढे काय होणार? कोण उपांत्य फेरीत धडक मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

उपांत्य फेरीत जाण्याचे समीकरण बदलले

दक्षिण आफ्रिकाबाबत बोलायचे झाल्यास या संघाने आपल्या आधीच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाला 107 धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियासोबतचा सामना रद्द झाल्यानंतर या संघाच्या खात्यात एकूण तीन अंक झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघासाठी उपांत्य फेरीत जाण्याचे समीकरण बदलले आहे. 

दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत कसा पोहोचू शकतो? 

वर उल्लेख केल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका बी ग्रुपमध्ये आहे. या संघाच्या नावावर तीन अंक आहेत. ऑस्ट्रेलिया संघालाही तीन अंक मिळालेले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचे रन-रेट कमी आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक सामना बाकी आहे. हा सामना 1 मार्च रोजी इंग्लंड या संघाविरोधात होणार आहे. इंग्लंडविरोधातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाल्यास तो थेट उपांत्य फेरीत धडक मारेल.

तर दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवीत होणार

दुसरीकडे दक्षिण आफ्रिका इंग्लंड संघासोबतच्या सामन्यात पराभूत झाल्यास त्यांचे अंक फक्त तीन राहतील. अशा स्थितीत अफगाणिस्तान या संघाने इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच्या कोणत्याही एका सामन्यात विजय मिळवल्यास दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवीत होतील. इंग्लंडला चार अंक मिळाले आणि अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचे गुण समान होतील. असे झाले तर सर्वाधिक रन रेट असणारा संघ उपांत्य फेरीत जाईल. 

ग्रुप-बी पॉइंट टेबल 

ग्रुप-बी मध्ये एकूण चार संघ आहेत. यातील दक्षिण आफ्रिका संघ 3 अंक मिळवून सर्वोच्च स्थानावर आहे. या संघाचे रन रेट +2.140 आहे. दुसऱ्या स्थानावर  ऑस्ट्रेलिया हा संघ आहे. या संघाच्याही खात्यावर तीन अंक आहेत. या संघाचा रन रेट +0.475 आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे दोन्ही संघ गुणतालिकेत खातं खोलू शकलेले नाहीत. इंग्लंडचा रन रेट -0.475 आहे. तर अफगाणिस्तानचा रन रेट -2.140 आहे. 

हेही वाचा :

चॅम्पियन्स ट्रॉफी दहशतीच्या सावटाखाली, पाकिस्तानमध्ये हायअलर्ट; परदेशी नागरिक हिटलिस्टवर; नेमकं प्रकरण काय? 

Fact Check : टीम इंडियाच्या खेळाडूंचा डान्स करतानाचा जुना व्हिडिओ नवा म्हणून व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 

Champions Trophy 2025 Team India Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणासोबत होणार?; पाहा A टू Z माहिती

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget