एक्स्प्लोर
महाशिवरात्रीला कलर्स मराठी भक्तीमय होणार, जय जय स्वामी समर्थ, आई तुळजाभवानीचे विशेष एपिसोड दाखवले जाणार!
कलर्स मराठी या वाहिनीवर जय जय स्वामी समर्थ आणि आई तुळजाभवानी मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग 26 फेब्रुवारी रोजी दाखवले जाणार आहेत.
mahashivratri jay jay swami samarth and aai tulja bhavani
1/6

मुंबई : कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर्थ आणि आई तुळजाभवानी मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग 26 फेब्रुवारी रोजी अनुक्रमे रात्री 8 आणि 9 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहेत. प्रत्येक माणसात देव असतो त्याला नाकारू नका, हा माणुसकीची शिकवण देणारा संदेश यंदाच्या जय जय स्वामी समर्थ मालिकेतील महाशिवरात्री विशेष सप्ताहाचा महत्त्वाचा पैलू असणार आहे. देवी पार्वती अक्कलकोटात एक सामान्य स्त्री म्हणून राहू लागते. रोजचे जीवन जगण्यासाठी मदत मागू लागते. तिला गावकऱ्यांनी मदत करावी म्हणून स्वामी त्यांना भेटून प्रेरित करत आहेत.
2/6

पण महाशिवरात्रीच्या उत्सवात महादेवाकडून खूप काही मिळवण्याच्या धुंदीत असलेला प्रत्येक गावकरी फक्त उत्सव साजरा करण्यात मग्न आहे. त्या गरीब सामान्य स्त्रीला कोणीही मदत करत नाही. माणसातली माणुसकी हरवलेली पाहून देवी पार्वती व्यथित होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ती सामान्य गरीब स्त्री, देवी पार्वतीमध्ये रूपांतरित होते. तिचा क्रोध अनावर होतो.
Published at : 25 Feb 2025 05:22 PM (IST)
आणखी पाहा























