एक्स्प्लोर
'बालवीर'ला लागली हळद, लवकरच अडकणार लग्नबंधनात, देव जोशीची राजकुमारी दिसते तरी कशी?
Dev Joshi Marriage : बालवीर या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला देव जोशी आता लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या विवाहापूर्वीच्या वेगवेगळ्या समारंभांना सुरुवात झाली आहे.
baalveer dev joshi got married
1/9

Dev Joshi Haldi Ceremony :'बालवीर' या प्रसिद्ध मालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचलेला अभिनेता देव जोशी लग्नबंधनात अडकतोय.
2/9

लवकरच त्याचे लग्न होणार असून त्यासाठीच्या वेगवेगळ्या विधी आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमांचे फोटो खुद्द देव जोशी यानेच आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत.
3/9

देव जोशी याच्या लग्नातील मेहेंदळी समारंभ नुकताच पार पडला. त्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर नुकतेच त्याच्या लग्नाचा हळदी समारंभही पार पडला आहे. त्याचेही फोटो त्याने समाजमाध्यमावर शेअर केले आहेत.
4/9

देव जोशी याने आपले लग्न थेट नेपाळमध्ये ठेवले आहे. मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडत आहे.
5/9

हळद समारंभासाठी देव जोशीने एकदम आकर्षक कपडे परिधान केले आहेत. या कपड्यांत तो एखाद्या राजकुमारासारखाच दिसतोय.
6/9

त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. सोबतच त्याने गोल्डन कलरची धोती घातली आहे. सोबतीला त्याने मरून रंगाची शॉल घेतलेली आहे.
7/9

तर देव जोशी याची होणारी बायको म्हणजेच आरतीने मल्टिकलर्ड लेहंगा परिधान करून त्याला मॅच करणारा स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे. सोबतीला तिने सोनेरी रंगाचा दुपट्टा घेतलेला आहे.
8/9

या लग्न समारंभाला देव जोशी आणि आरती या दोघांचेही कुटुंबीय सामील झाले आहेत. मोठ्या आनंदात हा लग्नसोहळा पार पडोय.
9/9

विशेष म्हणजे आपल्या लग्नापूर्वीच्या समारंभात देव जोशीने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत डान्सदेखील केलाय. दोघेही आनंदात नाचतानाचे फोटोही देवने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 25 Feb 2025 09:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
पुणे
























